इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

विल्यम् कॅव्हेंडिश बेंटिंग

  


गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲम्हस्टनंतर गव्हर्नर जनरल या नात्याने विल्यम् कॅव्हेंडिश बेंटिंग भारतात आला आणि जुलै 1828 मध्ये त्याने आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. इंग्लंडच्या उमराव घराण्यात जन्म घेतलेल्या बेंटिंग याने आपल्या जीवनाचा प्रारंभ लष्करी सेवेपासून केला आणि लवकरच तो लेफ्टनंट कर्नलच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. 1796 मध्ये तो संसदेचा सदस्य बनला. युरोपात यावेळी सर्वत्र युद्धमय वातावरण होते. स्वतः बेंटिंग उत्तर इटलीत नेपोलियन विरुद्ध लढला.  त्याच्या लष्करातील अनुभवामुळेच 1803 मध्ये बेंटिंगची नियुक्ती मद्रासचा गव्हर्नर म्हणून करण्यात आली. यामध्ये मद्रास इलाख्यातील वेल्लोर येथील लष्करी छावणी येथील सैनिकांना त्याने गंध लावण्यास व कानात कुंडले घालण्यास मनाई केले, त्यामुळे वेल्लोर छावणीत इंग्रजांविरुद्ध बंड झाले. या बंडाचे दमन करण्यात आले मात्र बेंटिंगला इंग्लंडला परत बोलावून घेण्यात आले. 1828 मध्ये लॉर्ड अम्हस्टनंतर गव्हर्नर जनरल म्हणून बेंटिंगची नियुक्ती झाली. तो उदारमतवादी होता. ज्यामुळे इंग्लंडमध्ये सुधारणांचे युग सुरू झाले या आदर्शांनी बेंटिंग प्रेरित झालेला होता. 1812 मध्ये बेंटिंग सिसिली बेटावर इंग्रज फौजेचे नेतृत्व करीत असताना त्याने तेथील जनतेला इंग्लंड प्रमाणे घटनात्मक शासन पद्धती राबवण्याची प्रेरणा दिली होती. प्रजेचे कल्याण हाच शासनाचा उद्देश आहे याची त्यांला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच आपल्या कार्यकाळात त्याने क्रूर प्रथा बंद केल्या. जनतेला विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. जनतेचा नैतिक आणि बौद्धिक विकास घडवून आणणे. शासक या नात्याने आपले कार्य आहे अशी त्यांची भावना होती. सतीप्रथा यासारख्या सामाजिक दुष्ट प्रथांना समाप्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ठगांचा बंदोबस्त करून देशात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. लहान पदांवर भारतीयांची नियुक्ती केली. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याबाबत चांगल्या वृत्तीचे प्रदर्शन केले आणि भारतीय शिक्षण पद्धतीत महत्त्वाचे बदल घडवून आणले.

            बेंटिंगच्या आधी कोणत्याही गव्हर्नर जनरलने सामाजिक प्रश्न सोडविण्याबाबत इतके धाडस दाखवले नाही. बेंटिंग ने मात्र सतीप्रथा व शिशुवध बंद करून हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसेच ठगांचा बंदोबस्त करून जनतेला शांतता प्राप्त करून दिली. सतीची प्रथा बंद करण्याचे काही प्रयत्न या अगोदरही झाले होते. अकबराने ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले होते. मराठ्यांनी आपल्या प्रदेशात तसे प्रयत्न केले होते. गोव्यात पोर्तुगीजांनी आणि चंद् नगरला फ्रेंचांनी सती न जाण्यासाठी काही उपाय योजना केल्या होत्या. त्यानंतर भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक प्रथा परंपरांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे कंपनीने ठरवले. कॉर्नवालीस, मिंटो, लॉर्ड हेस्टींग यांनी याबाबतीत बळाचा वापर, अल्पवयस्क मुलगी, गर्भवती स्त्री यांना सती न जाऊ देणे यासारखे काही बंधने लावण्याचा प्रयोग केला पण त्यात त्यांना यश आले नाही. राजा राममोहन राॅय सारख्या भारतीय सुधारकांनी सतीप्रथा बेकायदेशीर ठरविण्याबाबत बेंटिंगला प्रोत्साहन दिले. राजा राममोहन रॉय आपल्या भावजयीच्या सती जाण्यामुळे अतिशय दुःखी होते आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली. सतीप्रथेवर त्यांनी अनेक लेख लिहिले व पुस्तिका प्रकाशित केल्या. तत्कालीन सुधारक वृत्तपत्रांनी राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचे समर्थन केले. त्यामुळे बेंटिंगला हे बळ मिळाले. बेंटिंग यासंबंधित खूप माहिती गोळा केली. त्याबाबत लष्करी अधिकारी, न्यायाधीश, पोलिस अधिकारी यांच्याशी विचारविनिमय केला आणि या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचला की बंड होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे डिसेंबर 1829 च्या नियम सतरा द्वारा सती प्रथेला अवैध घोषित करण्यात आले. सती जाण्यास प्रोत्साहन देणारे, मदत करणारे मानवतेचे गुन्हेगार मानल्या जातील असेही जाहीर करण्यात आले. प्रारंभी हा नियम बंगालमध्ये लागू झाला. पुढे 1830 मध्ये मद्रास व मुंबई इलाख्यात लागू केला गेला. या कायद्यामुळे फारसा असंतोष निर्माण झाला नाही. रूढीवाद्यांनी कायद्याविरुद्ध प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले. राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर यांसारख्या लोकांनी इंग्लंडच्या राजाला पत्र लिहून त्यात बॅटिंगला धन्यवाद दिले.
           काही राजपूत जमातींमध्ये मुलीला जन्मताच ठार करण्याची प्रथा चालत आलेली होती. त्यासाठी क्रूर पद्धतींचा अवलंब केला जात असे. वीषप्रयोग करणे, नदीत फेकून देणे अशा अमानवी मार्गांचा निर्दयपणे आणि सर्रास वापर केला जाई. बनारस प्रदेशातील राजपूत जमाती, कच्छ आणि गुजरातमधील झरिजा राजपूत तसेच जयपुर, जोधपुर मधील राठोड, मेवाती यांच्यात भ्रूणहत्येचे प्रमाण जास्त होते. 1795 मध्ये अशी प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली असली तरीही अमानवी प्रथा सुरू होते. ती बंद करण्यासाठी पेंटिंग ने कडक पावले उचलली. बंगालमधील सागर भागात आणि मद्रास प्रांतात काही ठिकाणी काही विशिष्ट प्रसंगी नरबळी दिला जात आहेत. त्याकरिता प्रामुख्याने बालकाची निवड करण्यात येई याकडे लक्ष वेधले गेले. ही दुष्ट प्रथा बंद करण्याचे आदेश दिले. 'ठग' हा शब्द सामान्यता फसवणूक करण्यासाठी  प्रचलित आहे. पण पूर्वी म्हणजे निर्दोष व दुर्बल लोकांना लुटणारा, व हत्यारांचा एक समूह होता. ठग रुमालाच्या सहाय्याने आपली शिकार ठार करण्यात निष्णात होते. मुघल साम्राज्याच्या पतन काळात पोलिस व्यवस्था अस्ताव्यस्त झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व त्याचा फायदा घेऊन ठगांनी आपल्या कार्यक्षेत्राचा अधिकच विस्तार केला व सर्वत्र रस्त्यांची सुरक्षित राहिले नाही. ठगांची संख्या वाढली आणि त्यांच्या टोळ्या अस्तित्वात आल्या. लहान-लहान संस्थानांमधील अधिकारी ठगांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांच्याशी हातमिळवणी करीत. अवध पासून हैदराबाद पर्यंत आणि राजपुताना व बुंदेलखंड मध्ये ठग विशेष सक्रिय होते. ठगांचा कोणता विशिष्ट धर्म नव्हता, जात नव्हती. हिंदू व मुसलमान दोघेही त्यांच्यात सामील होते. हे लोक काली, दुर्गा, भवानी ह्यांची पूजा करीत आणि शिकारीचे डोके कापून देवीला बळी देत. हा व्यवसाय विधिलिखित आहे आणि त्यांच्या शिकारीचा मृत्यू अशाच प्रकारे लिहून ठेवला आहे यावर ठगांचा विश्वास होता. ठगांच्या टोळीचे संघटन आणि परस्पर सहकार्य फार चांगले होते. काही लोक बातम्या काढण्याचे काम करीत, काही रुमालाने गळा आवळण्यात पटाईत होते. तर काही जमीनीत खड्डे खोदून मृतकाला  चीरविश्रांती देत. त्यांची स्वतःची सांकेतिक भाषा व वेगवेगळे संकेत होते. या व्यवसायात प्रवेश करणाऱ्यास पद्धतशीर प्रशिक्षण देऊन अनूभवाव्दारे तयार केले जाई व त्यांची खात्री पटल्यावर एका विशिष्ट कर्मकांडांद्वारे त्याला दीक्षा दिली जाई. यांची कार्यपद्धती इतकी यशस्वी, काटेकर होती, ते प्रयत्न असफल झाल्यास एकही दावा सरकारसमोर कधीच आला नाही. कधी कधी ठगांच्या टोळीत 400 पर्यंत सदस्य असत. एकावेळी दहा बारा लोकांची हत्या करण्यात येई. ठगांच्या बंदोबस्तबाबत संपूर्ण जनतेचे समर्थन सरकारला होते. ठगांचा बंदोबस्त करण्याचे कार्य आम्हा कर्नल विलियम स्लिमनकडे सोपवण्यात आले. त्यात सहकार्य करण्यासाठी स्थानिक संस्थांना आवाहन केले गेले. परिणामी पंधराशेच्या जवळपास ठग पकडण्यात आले. त्यातील अनेकांना फाशी देण्यात आली. उरलेल्यांना आजीवन कारावास अशी शिक्षा झाली. 1837 नंतर ठग संघटित रूपाने आढळले नाहीत.
       वृत्तपत्रांप्रति बेंटिंगचे धोरण उदार होते. तो वृत्तपत्रांना असंतोष व्यक्त करण्याचे साधन मानत असे. बेंटिंगच्या भत्ता बंद करण्यावर तसेच इतर आर्थिक सुधारणांवर वृत्तपत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटली तरीही तो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समर्थक राहिला. यासंबंधी बेंटिगने पत्र लिहून आपली भूमिका विशद केली की, कलकत्ता व मद्रास येथे सारखीच परिस्थिती असताना मद्रासला लष्करी बंड झाले. कारण तेथील वृत्तपत्रांना स्वातंत्र्य नव्हते. याची भावना सार्वजनिक रूपाने व्यक्त होण्यात नुकसान कमी आणि फायदा अधिक याबद्दल त्याला पूर्ण विश्वास होता. प्रत्यक्षात घडले तसेच. जनतेच्या प्रकट झालेल्या भावना म्हणून सत्यस्थिती समोर आली. त्यामुळे सरकारच्या विचारांना पुष्टी मिळून कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. या दृष्टीने एखाद्या प्रस्तावावर वादविवाद होणे यासंबंधीचा अंतिम निर्णय होणार आहे म्हणूनच भत्ता बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी त्यावर चर्चा करण्यास प्रतिबंध घातला. पत्रकारांनी वृत्तपत्राच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली त्यावेळी त्यांना आश्वासन दिले की, हा विषय योग्य कायदा करण्याचा प्रस्ताव आधीपासूनच विचाराधीन आहे आणि अशी आशा करूया की लवकरच एक पद्धती अस्तित्वात येईल सार्वजनिक चर्चेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण मिळेल शिवाय त्यामुळे सरकार व राज्य येणार नाही तसेच खोट्या आरोपांपासून जनतेला संरक्षण मिळेल. मार्च 1835 मध्ये प्रकृतीच्या कारणावरून त्यागपत्र द्यावे लागले. त्यामुळे वृत्तपत्रांवरील बंधन काढून घेण्याचे श्रेय त्याचा उत्तराधिकारी चान्स मेटकाफला मिळाले. 

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال