मुघल सत्तेची दुर्बलता आणि अहमदशहा अब्दलीची सतत होणारी आक्रमणे यामुळे पंजाबमध्ये गोंधळाचे व अराजकतेचे वातावरण निर्माण झाले. पंजाब प्रदेश आपल्या अफगाण साम्राज्याचा एक भाग आहे असा अब्दालीचा दावा होता मात्र त्याने नियुक्त केलेले गव्हर्नर पंजाबमधून कर वसूल करण्यापलीकडे कोणताही राज्यकारभार चालवत नव्हते. अहमदशहा अब्दालीचे वारसदार पंजाबवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत त्यामुळे पंजाबमध्ये कोणाचीही सत्ता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा ह्या विशिष्ट राजकीय परिस्थितीतून शिख सरदारांच्या नेतृत्वाखाली काही मिसल उदयास आली आणि त्यांनी पंजाबच्या बर्याच मोठ्या भागावर वर्चस्व प्रस्थापित केले. वरील राज्यांमध्ये महत्त्वाची अशी बारा मिसल होती. रावी आणि चिनाब ह्यामध्ये असलेले सुकरचाकिया त्यापैकीच एक होते. सुकरचाकियाचा प्रमुख महासिंह ह्याचा मुलगा रणजीतसिंह होय. त्याचा जन्म गुजरानवाला येथे 2 नोव्हेंबर सतराशे 1780 रोजी झाला. महासिंहाच्या मृत्यूच्या वेळी रणजीतचे वय फक्त बारा वर्षे होते. पण त्याने लवकरच राजकीय स्थितीवर आपली पकड बसलेली. 1792 ते 1797 या काळात राज्याचा कारभार एका मंडळाकडे होता. त्यात रणजीतची आई, सासू, दिवाण लखपतराय यांचा समावेश होता. त्यानंतर सतराशे 1797 पासून रणजीतसिंहाने आपल्या मिसलचा कारभार पूर्णता आपल्या हातात घेतला. पूर्ण सत्ता रणजितसिंहांने आपल्याकडे घेतली तेंव्हा त्याचे वर्चस्व रावी व झेलम नद्यांमधील काही प्रदेशापुरते मर्यादित होते. रावी आणि बीयास नद्यांमधील पहाडी प्रदेशापासून सतलजच्या काठाने रचना प्रदेशापर्यंत भांगी मिसल होते ज्यात अत्यंत महत्त्वाची अशी लाहोर व अमृतसर ही नगरे होती. अमृतसरच्या उत्तरेकडे कन्हैया नावाचे मिसल होते. जालंधर दुआबचे प्रदेश अहलुवालिया मिसलच्या नियंत्रणात होते. सतलज नदीच्या दक्षिणेला पतियाळा, नाभा आणि कैथल या राज्यात फुलकियां सरदारांचे शासन होते आणि त्यांचा प्रदेश यमुना नदीपर्यंत घसरला होता. कसूर, मुलतान, अटक, पेशावर आणि काश्मीरमध्ये वेगवेगळे अफगाण सरदार राज्य करीत होते आणि ते काबूलच्या केंद्रसत्तेला जुमानीत नव्हते. अहमदशहा अब्दालीचा नातू झमानशहा स्वतःला पंजाबचा स्वामी मानत असे आणि आपले स्वामित्व दाखविण्यासाठी त्याने पंजाबवर अनेक आक्रमणे केली.
रणजीतसिंह पंजाबच्या मैदानी भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात गुंतला होता. त्याच सुमारास कांगड्याचा डोगरा सरदार संसारचंद कटोच आजूबाजूच्या पहाडी प्रदेशात आपला प्रभाव वाढवित होता. 1804 मध्ये संसारचंदने पहाडी प्रदेशातून खाली उतरून बजवडा व होशियारपुरवर आक्रमण केले. परंतु रंणजितसिंहाच्या सैन्याने त्याचा पराभव करून होशियारपूरवर रणजीतचा अधिकार प्रस्थापित केला. त्यामुळे संसारचंदने पुन्हा पहाडी प्रदेशावर लक्ष केंद्रित केले. परिणामी भयभीत झालेल्या कहलूरच्या राजाने नेपाळच्या गुरख्यांना मदत मागितली. त्यानुसार अमरसिंह थापाच्या नेतृत्वाखाली गुरख्यांनी कांगडाला वेढा घातला. गुरख्यांशी टक्कर देण्याइतपत एकट्या संसारचंदची ताकद नसल्याने रणजीतकडे मदतीची याचना केली. त्याबद्दल त्याने कांगड्याचा किल्ला रणजितला देण्याचे मान्य केले. दिवाण मोहकचंदच्या अधिपत्याखाली शिख सैन्याने त्यांना पराभूत केले. कांगड्यावर शिखांचा अधिकार प्रस्थापित झाला आणि संसारचंद रणजीतच्या सुरक्षीततेखाली आला. त्यावर गुरख्यांनी इंग्रजांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे परस्पर संबंध फारसे चांगले नव्हते आणि पुढे 1814 ते 1816 असे त्यांच्या दरम्यान युद्धही झाले. 1834 मध्ये जम्मूचा राजा गुलाबसिंहने लढाई जिंकून घेतले. रणजीतसिंहाच्या कारकिर्दीतील अखेरच्या दिवसात इंग्रजी भाषिक संबंध चांगले नव्हते आणि रंजीत ने 1837 मध्ये नेपाळच्या दुताचे स्वागत करून आपल्या सैन्यात गुरख्यांना भरती केले. पंजाब अहमदशहा अब्दालीच्या साम्राज्याचा भाग होता पण 1772 मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर काश्मीर, मुलतान इत्यादी वगळता उरलेल्या प्रदेशावर शिखांचा अधिकार प्रस्थापित झाला व त्यांची लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अफगाणांच्या अंतर्गत संघर्षामुळे आपली शक्ती वाढवण्याची चांगली संधी रणजितसिंहाला मिळाली. 1800 मध्ये अहमदशहा अब्दालीचा नातू शाहशुजा अफगाणिस्तान शासक बनला परंतु त्याचा भाऊ शहा महमदने शक्तिशाली बरकजई सरदार फतेहखॉ व दोस्त महंमद यांच्या मदतीने 1809 मध्ये शहशुजाला काढले. आपल्या स्थितीचा फायदा घेऊन ह्या बरकजाई सरदारांनी काश्मीर व पेशावरवर अधिकार प्रस्थापित केला.
सट्टाभ्रष्ट झालेल्या शाहाशुजाने पुन्हा गादी मिळवण्यासाठी रणजितसिंहाला मदत मागितली. ह्याचवेळी शहाशुजाने रणजितसिंहाला कोहिनूर हिरा भेट दिला. शहाशुजाच्या नावाखाली मुलतान, काश्मीर तसेच सिंधू नदीच्या पूर्वेकडील प्रदेश जिंकण्याचा रणजीत मानस होताच. पण रणजितकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने शहाशुजा इंग्रज संरक्षणाखाली निघून गेला. 1831 मध्ये शाहशुजाने पुन्हा रणजितडे मदत मागितली. रणजितने मदत करण्याचे कबूल केले पण शहाशुजासमोर काही अटी ठेवल्या. शाहाशुजाने आपल्या युवराजाला काही सैन्यासह लाहोर येथे ठेवावे. अफगाणिस्तानात गोहत्याबंदी करावी. सोमनाथ मंदिराचे दरवाजे रणजितला परत करावे. परंतु वरील अटी मान्य करण्यास शाहशुजाने नकार दिला. इंग्रजांनी शाहशुजाला मदत केली नाही. 1835 मध्ये रणजीतसिंहे वरील अटी मागे घेऊन शाहशुजाशी एक तह केला. ज्यानुसार त्याला सिंधू नदीच्या पश्चिमेकडील तटीय प्रदेश घेण्यास अनुमती मिळाली. संधीचा फायदा घेऊन रणजितने पेशावर जिंकून घेतले. ह्यावर वृद्ध झालेला अफगाणिस्तानचा सत्ताधारी दोस्त मोहम्मदने 40000 टोळीवाल्यांच्या सैन्यासह पेशावरवर आक्रमण केले परंतु रणजितसिंहाचा सेनापती हरीसिंह नलवा ह्याने पेशावरचे रक्षण तर केलेच शिवाय जमरूदचा किल्ला जिंकून घेतला. त्यामुळे खैबरखिंडीच्या पूर्वेकडील प्रदेश रणजीतच्या ताब्यात आला.