इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

आर्य समाज


      

        पाश्चात्त्य प्रभावाच्या प्रक्रियेतून आर्य समाजाची चळवळ जन्माला आली. आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर यांचा जन्म 1824 मध्ये गुजरात मधील मोरवी संस्थानात एका ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या पित्याने त्यांना वेद वांङमय, न्याय, दर्शन इत्यादीचे शिक्षण दिले. मूळशंकर यांच्या जिज्ञासेने त्यांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केले. ते पंधरा वर्षे सतत भटकत राहिले. 1860 मध्ये मथुरेला गेल्यावर स्वामी वरदानंद यांच्याकडून त्यांना वेदांचा खरा अर्थ समजला व परिणामी वैदिक धर्माप्रती प्रगाढ श्रद्धा निर्माण झाली. मूळशंकर आता स्वामी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. प्राचीन वैदिक धर्माला शुद्ध रूपात समोर आणण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी मुंबई येथे 1895 मध्ये 'आर्य समाजा'ची स्थापना केली. 'वेदांकडे परत चला' ही दयानंद यांची घोषणा होती. काळाच्या ओघात हिंदू धर्मात शिरलेले दुष्ट प्रथा, खोट्या अंधश्रद्धा दूर करणे त्यांचे उद्दिष्ट होते. 1877 मध्ये लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन झाल्यानंतर समाजाचे कार्य वेगाने वाढू लागले. धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य असलेला भारत त्यांच्या डोळ्यासमोर होता. आर्यधर्म हाच देशाचा धर्माचा वापर दयानंद यांची मनस्वी इच्छा होती. धार्मिक बाबतीत अवडंबर माजवणाऱ्या मूर्तिपूजा, बहू दैववाद, अवतार कल्पना, पशुबळी, श्राद्धकर्म, यंत्र तंत्र मंत्र इत्यादी गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. ईश्वरी ज्ञान आहे यावर त्यांची श्रद्धा होते आणि ते उपनिषद काळापर्यंतच्या साहित्याला मान्यता देत. इतर साहित्य विशेषतः पुराणांना जात वरील खोट्या गोष्टी यांचा समावेश आढळतो. त्यांचे असे प्रतिपादन होते की वेदांची भाषा अतिप्राचीन आहे. त्यामुळे त्यांच्यावरील वेळोवेळी लिहिले गेलेले भाषण स्पष्टीकरण पूर्णसत्य नाही. त्यामुळे आपल्या बुद्धीचा प्रयोग करून वेदमंत्रांचा त्यांच्या अर्थांना तर्काच्या कसोटीवर पारखून घ्या आणि नंतर आत्मसात करा असा सल्ला दयानंद देत. ते स्वतः संस्कृतचे प्रकांडपंडित होते. जागोजागी जाऊन त्यांनी शास्त्रास्त्र केला व अनिष्ट प्रथांना, अंधश्रद्धांना वेदांमध्ये कोणताही आधार नाही हे सिद्ध केले.

         जग म्हणजे माया होय, आत्मा ईश्वराचा अंश आहे, जीवनमुक्ती हेच जीवनाचे उद्दिष्ट या तत्त्वज्ञानाला दयानंदांनी विरोध केला. त्यांच्या मते प्रकृती, आत्मा आणि ईश्वर अनादि व अनंत आहेत. प्रत्येकाने मानव धर्माचे आचरण करून मोक्ष मिळवावा. अशाप्रकारे दयानंदांनी नियती ऐवजी कर्मावर भरतीला नियतीच्या हातचे खेळणे न मानता कर्माद्वारे मानव स्वतःचे भाग्य घडवू शकतो असे त्यांचे प्रतिपादन होते. दयानंद यांच्या मृत्यूनंतर त्यांनी दिलेली शिकवण योगी अरविंद घोष सारख्यांनी अंगीकारली व दयानंद यांच्या कार्याची स्तुती केली. हिंदूमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान ब्राह्मण पुरोहितांना देण्याच्या कल्पनेला दयानंदांनी आव्हान दिले. ब्राह्मण म्हणजे ईश्वर आणि इतर मानव यांच्यामधील दुवा होय या कल्पनेलाही त्यांनी हास्यास्पद ठरविले. प्रत्येक व्यक्तीला वेदांचे अध्ययन करण्याचा आणि आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे असे ते मानीत. सामाजिक बाबतीत त्यावेळी अस्तित्वात असलेल्या जाती पद्धती, अस्पृश्यता, बालविवाह अशा वाईट प्रथांवर त्यांनी जोरदार प्रहार केले, भारतीय सामाजिक इतिहासात दयानंद पहिले समाज सुधारक होते ज्यांनी क्षुद्र आणि स्त्रियांना वेदांचे अध्ययन करण्याचा उच्च शिक्षण घेण्याचा यज्ञोपवीत घालण्याचा तसेच सर्वच दृष्टीने उच्च जात व पुरुषांबरोबर अधिकार प्राप्त करण्यासाठी चळवळ उभारली. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या मते मुले व मुली समान आहेत बालविवाह, कायम वैधव्य, पडदा पद्धती, हुंडापद्धती, बहुपत्नी, देवदासी प्रथा या सामाजिक दुष्ट प्रवृत्तींवर दयानंद कठोर प्रहार करीत. सर्वजण समान आहेत असे त्यांचे मत होते.  आज घटनेत आढळून येणारी समानतेची भावना दयानंदांनी त्या काळात जागृत केली. भारताच्या इतिहासात हिंदू धर्म व समाजात इतके मूलभूत चिंतन व कार्य करणारा दूरदृष्टी ठेवणारा व्यापक भूमिका बाळगणारा आणि प्रभावशाली सुधारक आजपर्यंत झालेला नाही. अशा समाजसुधारकांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा दृश्य परिणाम म्हणजे भारताच्या घटनेत समानतेला असलेले स्थान व स्त्री पुरुष यांना समान अधिकार मिळणे होय.
          दयानंदांनी 'सत्यार्थप्रकाश' नावाच्या ग्रंथात आपले विचार मांडले आहेत. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्यांना ब्राह्मण समाज किंवा थिओसोफिकल सोसायटी जवळची वाटत होती पण दयानंद यांच्या उपदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, शिक्षण व समाज यांमध्ये समन्वय होता. त्यांचे प्रतिपादन एवढेच होते की वेद आणि उपनिषदां पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आणि ज्या प्रथा, कर्मकांड, सामाजिक दुष्प्रवृत्ती आज आहेत त्या  वेदांमधील नाहीत. प्रमुख्याने ख्रिश्चन आणि मुसलमान धर्म प्रचारक हिंदू धर्मातील वाईट प्रथा, अंधविश्वास यांची टिंगल टवाळी करीत. दयानंदांनी अशा धर्म प्रचारकांच्या धर्मातील दोष दाखवून दिले व जागोजागी शस्त्रास्त्र करून इतर धर्माच्या प्रचारकांना तसेच जुन्या कर्मठ यांना पराभूत केले. त्याचा परिणाम म्हणजे हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये आत्मविश्वासाची, आत्मपरीक्षणाची भावना जागृत झाली. काही लोकांनी दयानंद यांच्या विचारांना मर्यादित असे म्हटले. पण प्रत्यक्षात दयानंद व्यापक व उदार विचार करणारे, प्राचीन हिंदू धर्माच्या परंपरांशी नाते जोडणारे होते. वरवर पाहता या चळवळीचे स्वरूप व त्यांची स्थापना करणे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात समाजाने आधुनिक ज्ञान आणि सर्वात जास्त प्रभाव शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सेवा क्षेत्रात पडलेला आढळतो. समाजाच्या सामाजिक विचारांमध्ये इतर गोष्टींबरोबरच ईश्वराचे सर्वव्यापकत्व, स्त्री पुरुष समानता, न्याय दिलेला होता. शिक्षण व ज्ञान प्रसारावर समाजाने बरेच लक्ष केंद्रित केले. दयानंद यांच्या मृत्यूनंतर स्थापन झालेल्या दयानंद संस्था लवकरच सर्व देशभर पसरल्या. दयानंद यांचे शिष्य प्रतिगामी नव्हते. त्यांनी इंग्रजी भाषा व ज्ञान आत्मसात केले पाश्चात्य व पौर्वात्य ज्ञानाचा योग्य समन्वय समाजाच्या अनुयायांमध्ये झालेला होता. त्यामुळे आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आर्य समाजाने अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. 1892 च्या सुमारास आर्यसमाज दोन गटात विभाजित झाला. एक गट पाश्चात्य शिक्षणाचा विरोधक होता. त्यांनी 1902 मध्ये हरिद्वार येथे गुरुकुल स्थापन केले. तेथे प्राचीन वैदिक शिक्षण प्राचीन पद्धतीप्रमाणे दिले जाऊ लागले. त्याच्या अनुकरणाने इतर ठिकाणी गुरूकुल स्थापन झाले.
         आर्य समाजाचे सिद्धांत आणि नियम सर्वात आधी मुंबई येथे तयार करण्यात आले. त्यानंतर 1877 मध्ये लाहोर येथे त्याचे संस्कार करून त्यांना निश्चित रूप देण्यात आले. ज्यात आजतागायत बदल करण्यात आले नाहीत. खऱ्या ज्ञानाचा मूळ स्त्रोत ईश्वर आहे  सत् चित् आनंद स्वरूपातील सर्वशक्तिमान निराकार अनादि-अनंत ईश्वर सृष्टीचा निर्माता आहे व त्याची उपासना केली पाहिजे  सर्व सत्य ज्ञानाचा ग्रंथ वेद आहे  त्याचे अध्ययन व अध्यापन तसेच वैज्ञानिक व एकंदरीत सर्व आर्यांचे परम कर्तव्य आहे. सत्य ग्रहण करण्यास आणि असत्याला त्यागण्यात सदैव तत्पर असले पाहिजे. सर्व कार्य धर्माप्रमाणे म्हणजे सत्य असा त्याचा विचार करून केले पाहिजे. शारीरिक, आध्यात्मिक व सामाजिक उन्नती करून जगाचे कल्याण करणे समाजाचा मुख्य उद्देश आहे. सर्वांशी धर्मानुसार प्रेमाने यथायोग्य व्यवहार करावा. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश उजळावा. वैयक्तिक कल्याणाचे ध्येय न ठेवता सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण समजावे. वैयक्तिक प्रगतीपेक्षा मानवजातीचे कल्याण श्रेष्ठ मानावे. हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याकरिता आर्य समाजाने शुद्धी आंदोलन सुरू केले. याच्याव्यतिरिक्त अंदाजे 60000 मलकाने राजपुताना मोकळा बंडा दरम्यान तसेच भारताच्या फाळणीच्या वेळी जबरदस्तीने मुसलमान बनवण्यात आलेल्या हिंदूंना पुन्हा आपल्या मूळ हिंदू धर्मात परत येण्याची संधी दिली. स्वामी दयानंद यांच्या आर्थिक विचारांमध्ये स्वदेशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. त्यांचे असे मत होते की वाईट ते वाईट आपले राज्य चांगल्यातल्या चांगल्या परकीय राज्यांपेक्षा केव्हाही उत्कृष्ट आहे. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये स्वदेशीची व देशभक्तीची भावना रोमारोमात भिनली होती. त्यामुळेच आर्यसमाजी राष्ट्रवादी आंदोलनात अग्रेसर होते. व्हॅलेंटाईन चिरोल आर्य समाजाला खर्‍या अर्थाने भारतीय असंतोषाचे जनक मानतो.  आर्य समाजाच्या मुख्य कार्यकर्त्यांमध्ये महात्मा हंसराज, पंडित गुरुदत्त, लाला लाजपत राय, स्वामी श्रद्धानंद यांच्यासारखे मान्यवर होते. आर्य समाजाचा प्रचार प्रमुख्याने पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार येथे झाला. 

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال