१९ वे शतक हे उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा उत्कर्ष होत असलेला काळ होय. वैचारिक क्रांतीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मराठी वृत्तपत्रांनी १९ व्या शतकात तयार केली. १९ व्या शतकात महाराष्ट्रात घडून आलेल्या सामाजिक स्थित्यंतरांचे प्रतिबिंब प्रारंभिक मराठी वृत्तपत्रांध्ये दिसून येते. १९ व्या शतकाच्या प्रारंभी मराठी वृत्तपत्रामुळे तत्कालिन समस्यांविषयीच्या लोकांच्या जाणिवा जागृत होऊन सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान झाले. १९ व्या
शतकात तत्कालीन मराठी वृत्तपत्रांनी जुन्या सामाजिक मूल्यांच्या संदर्भात मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या मते, "१९ व्या शतकात
महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनांच्या चळवळीची जी लाट उचंवून आली तिचे श्रेय तत्कालीन मराठी वृत्तपत्रांकडे जाते. महाराष्ट्राचे मन, त्यांच्या आकांक्षा, त्यांचे जय-पराजय समजून घ्यायचे असेल तर या वृत्तपत्रांनी केलेल्या कार्याकडे दृष्टी टाकल्याशिवाय गत्यंतर नाही." 'दर्पण' या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीत नवे पर्व सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या 'दर्पण' वृत्तपत्रातून समता व व्यक्तिस्वातंत्र्य तत्त्वावर समाजाची पुनर्रचना करायचा प्रयत्न केला. जांभेकरांनी 'दर्पण'ंच्या माध्यमातून सुधारकांची एक नवी परंपरा निर्माण केली. जांभेकरांनी 'दर्पण'च्या माध्यमातून एक नवे मन्वंतर घडवून आणले. हे पत्र साडेआठ वर्षे चालले. 'प्रभाकर' पत्राचे संपादक भाऊ महाजन हे कोणाचीही पर्वा न करता
स्वतंत्रपणे मत व्यक्त करणारे सुधारक पत्रकार होते. हे पत्र २१ वर्षे चालले. भारतातील अनेक वृत्तपत्रांतील मजकूर भाषांतरित करून या पत्रात छापला जाई. फ्रेंच क्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली होती. ब्रिटिश राजवटीचे दोष दाखविले तसेच फायदेही पत्रात मांडले. 'प्रभाकर' पत्राच्या माध्यमातून त्यांनी पाश्चात्त्य शिक्षणाचे, नव्या विचारा देऊन ज्ञानसंपतन्न समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'प्रभाकर' पत्राने स्वधर्म, स्वभाषा व स्वसंस्कृती यांची बाजू उचलून धरली. वृत्तपत्र व्यवसायाला सामाजिक परिस्थिती अनुकूल नसूनही त्यांनी पूर्ण वेळ रूपात वृत्तपत्र
व्यवसाय निवडला. भाऊ महाजन यांनी भारतीय संस्कृती, भाषा याविषयी 'प्रभाकर'मधून स्वाभिमानी विचार प्रकट केले. महाजन यांनी 'प्रभाकर' या पत्राबरोबरच 'धूमकेतू' साप्ताहिक व 'ज्ञानदर्शन' या नावाचे त्रैमासिक ही पत्रेही सुरू केली. भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीतींवर त्यांनी टीका केली. तसेच खिश्चन घर्माच्या प्रचाराच्या
विरोधात त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. 'प्रभाकर' पत्रातुनच लोकहितवादींची शतपते नियमित प्रकाशित झाली. 'प्रभाकर' पत्रातून भाऊ दाजी यांनी स्वकियांचे दोष मांडले. भाऊ महाजन यांनी 'धूमकेतू' या साप्ताहिकाचा सामाजिक जागृतीसाठीच उपयोग करून घेतला. ज्ञानोदय हे ख्रिश्चन मताचा पुरस्कार करणारे पत्र होते. इ.स. १८४३ मध्ये रे. हेन्री वालंटाईन यांनी 'ज्ञानोदय' हे पत्र इंमजी व मराठी भाषेतून सुरू केले. अमेरिकन मिशनरींनी हे पत्र काढले होते. हिंदु धर्मातील अंधश्रद्धा, परंपरा व अनिष्ठ चालीरीती यावर ज्ञानोदय ने टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे हिंदू धर्मात सुधारणा होण्यास एक प्रकारची मदत झाली होती. ज्ञानोदयचा मुख्य उद्देश समाजात ज्ञानाचा प्रसार करणे हा होता. ज्ञानोदय ने नवे तत्वज्ञान, नवी युरोपियन संस्कृती याचा प्रभाव जनतेवर निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले.
२४ जानेरारी १८७४ ला विष्णुशासस्री चिपळूणकरांची निबंधमाला सुरू झाली. त्यांनी निबंधमालेतून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांचा जोरदार पुरस्कार करून लोकांतील अभिमान जागृत केला.
निबंध या प्रकाराला निबंधमालेने प्रतिष्ठा प्राप्त करन
दिली. लोकहितवादींनी 'शतपत्रां तून नवनिर्मितीचा ज्वलंत विचार शास्त्रीय दृष्टीने व आग्रहाने मांडून लोकांच्या गळी उतरविला. समाजातील अनिष्ट परंपरा, रीतिरिवाज
स्त्री शिक्षण, धर्म यासंबंधी परिवर्तनवादी लिखाण 'शतपत्रांतून' प्रकाशित झाले होते. विष्णू परशुराम पंडित यांनी हे पत्र इ.स. १८६२ मध्ये सुरू केले. सुरक्षित सरकारी नोकरीचा त्याग करून त्यांनी हे धाडस केले. हे पत्र इंग्रजी व मराठी असे द्विभाषी होते. या पत्राने सामाजिक सुधारणेचा कट्टर पुरस्कार केला होता. विधवा विवह,
स्त्री शिक्षण इ. सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला होता. न्या. नारायण गणेश चंदावरकर यांनी 'इंदुप्रकाश' च्या संपादकीय विभागात काम केले. इ.स. १८६७ मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे हे पत्र व्यासपीठ होते. नवविचारांचा, नवमतांचा प्रसार या पत्राने केला. मामा परमानंद, प्रा. न.र. फाटक, न्या म.गों. रानडे, न्या. तेलंग, न्या. चंदावरकर, त्र्यं.वि. पर्वते यांनी या पत्राची धुरा सांभाळली. हे पत्र ६२ वर्षे चालले. हे पत्र पुढे 'लोकमान्य'मध्ये विलीन झाले. हे पत्र ठाणे येथून इ.स. १८६६ पासून काशीनाथ विष्णू फडके यांनी सुरू केले. 'अरुणोदय'मध्ये सामाजिक व राजकीय प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत असे. राजकीय प्रश्नांत या पत्राचे धोरण ब्रिटिश सत्तेला प्रखर विरोध करणे हे होते. 'अरुणोदय' या पत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली. ४ जानेवारी १८६४ रोजी इंग्रजीत व १ जुलै १८६६ रोजी इंग्रजी व मराठी भाषेत हे पत्र निघत होते. विश्वनाथ नारायण मंडिलक यांनी 'नेटिव्ह ओपिनियन' हे पत्र सुरू केले. या वृत्तपत्रात नारायण परांजपे, हरिभाऊ परांजपे यांनी दीर्घकाळ लेखन केले. इ.स. १८८५ ते १८८८ च्या काळात राजकीय, सामाजिक व नैतिक विषयावर या पत्राने आपली स्वतंत्र मते प्रसिद्ध केली होती. इ.स. १८६१ पासून 'नेटिव्ह ओपिनियन' एका पानावर हायकोर्टाचे निवाडे देण्यात येत असत.
कृष्णराव भालेकर यांनी पुण्यामधून १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधू' हे पत्र सुरू केले. या पत्राने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, सावकारशाहीचे दोष यावर
लिखाण केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह या पत्राने धरला. 'दीनबंधू' हे पत्र लोकशिक्षणाचे, लोकजागृतीचे एक प्रभावी माध्यम म्हणून वाढले. 'दीनबंधू'चे स्थलांतर १८९० मध्ये मुंबईत होऊन नारायण मेघाजी लोखंडे हे संपादक झाले. इ.स. १८४९ मध्ये कृष्णाजी रानडे यांनी संपादित केलेले 'ज्ञानप्रकाश' साप्ताहिक पुण्यात सुरू झाले. 'सत्य सौख आणि ज्ञान' हे ब्रीद बाळगणारे 'ज्ञानप्रकाश' हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होय. ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन व ज्ञानप्रसार हे या पत्राचे हेतू होते. १८ सप्टेंबर १८७१ च्या अंकात इंग्रजांच्या पाश्चिमात्य संस्कृतीचा महाराष्ट्रातील समाजावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन आहे. १२ नोव्हेंबर १८४९ च्या अंकात सुशिक्षित लोकांमध्ये मद्यपानाची सवय वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. ३ डिसेंबर १८६० च्या ज्ञानप्रकाशातील एका स्फुटात मुलांना अलंकाराऐवजी
ज्ञानाने शोभवावे असे म्हटले होते. वेश्यागमन व व्यभिचारावरही 'ज्ञानप्रकाश' ने हल्ला केला होता. 'ज्ञानप्रकाश' हे पत्र १०० वर्षे चालले. १८४९ ला हे पत्र सुरू झाले. इ.स.१८५३ ला ते द्विसाप्ताहिक होते. इ.स. १९०४ पासून ते दैनिक होते. 'ज्ञानप्रकाश' हे समतोल
विचारचि पत्र होते. सामाजिक व इतिहासाचे साधन म्हणून ह पत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.

Tags
उपयुक्त माहिती