भारतासाठी वायव्य सीमा नेहमीच स्फोटक ठरली आहे. सीमेकडील टोळ्या संधी मिळताच भारतावर
हल्ले करीत. म्हणूनच यशस्वी राज्यकर्त्यांनी नेहमीच वायव्य सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
औरंगजेबही त्याला अपवाद नव्हता. त्याच्या कारकीर्दीत सीमेवरील टोळ्यांमधे शांतता होती. त्यांना आर्थिक मदत व्यवस्थित मिळत होती. काबूलचे प्रशासन उत्तम प्रकारे चालले होते आणि दिल्ली व काबूलमधे प्रशासकीय पत्रव्यवहार योग्य रितीने सुरू होता. परस्पर दळणवळणाचे मार्ग खुले होते. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर परिस्थिती झपाट्याने घसरू लागली. काबूलवरून बहादुरशाह निघून आल्यावर व वारसायुद्धात व्यस्त झाल्यावर काबूल व गझनीची घडी विस्कटू लागली सर्वत्र स्वार्थ, भ्रष्टाचार सुरू
झाला. त्यामुळे सीमा असुरक्षित बनली. अशा परिस्थितीत महत्वाकांक्षी व्यक्तींची महत्वाकांक्षा जागृत होणे
स्वाभाविक होते. सियार-उल-मुत्खरीनचा लेखक गुलाम हुसेन म्हणतो की राज्यपालांच्या नियुक्तीत पक्षपात होत असे. त्यामुळे अयोग्य राज्यपाल नियुक्त केले जात. अशा स्थितीत सीमेकडील टोळ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत न पोहचता मधल्यामधे अधिकारी वर्ग गडप करीत. सैन्यालाही वेतन व्यवस्थित मिळत नव्हते. एकूणच सीमा भागाची उपेक्षा होऊ लागली. इतकी की परकीय आक्रमणाची शक्यता दिल्लीला कळविण्यात आली तेंव्हा ती वार्ता कळविणाऱ्या मुगल राज्यपालाचीच थट्टा करण्यात आली. नादिरशहाचा जन्म खुरासानच्या तुर्कमान वंशात १६८८ मधे झाला. अफगाणांनी फारसवर आक्रमण केले तेंव्हा फारसचा संरक्षक म्हणून नादिरशहा नावारूपाला आला. १७२२ मधे अफगाणांनी कंदाहार जिंकून घेतले व फारसची राजधानी इस्पहानवर कब्जा मिळविला त्यावेळी प्रयत्नांची शर्थ करून नादिरशहाने अफगाणांना पिटाळून लावले. ह्या त्याच्या कार्यावर प्रसन्न होऊन फारस सम्राट शहा तहमास्पने नादिरशहाला आपल्या राज्यातील काही प्रदेश दिला. तेथे नादिशहा स्वतंत्रपणे शासन करीत असे. आपल्या नावाचे शिक्के त्याने प्रचलित केले होते. १७३६ मधे नादिरशहाने संपूर्ण फारसवर आपला अधिकार प्रस्थापित केला.
नादिरशहा अशाप्रकारे फारसचा शासक बनला असला तरी महत्वाचे कंदहार अफगाणांच्या ताब्यात होते. म्हणून नादिरशहा राज्यविस्ताराकडे वळला. कंदहारच्या अफगाणांना एकटे पाडण्याच्या दृष्टीने त्याने मुगल सम्राट मुहम्मदशाहला विनंती केली की, कंदहारच्या अफगाणांना काबूलमधे आश्रय मिळू नये. सम्राट मुहम्मदशाहने तसे आश्वासन नादिरशहाला दिले. परंतु प्रत्यक्षात १७३८ मध्ये नादिरशहाने कंदहारवर आक्रमण केले तेंव्हा काही अफगाणांनी मुगल प्रदेशातील गझनी व काबूल येथे आश्रय घेतला. मात्र नादिरशहाचे सैनिक मुगल सीमेत शिरले नाही. अशा स्थितीत नादिरशहाने एक दूतमंडळ दिल्लीला पाठविले. पण ह्या दूतमंडळातील सदस्यांची मुगल सैनिकांनी हत्या केली. खरे तर फारस आणि भारत ह्यांच्यात पूर्वीपासून दूतमंडळाचे येणे जाणे सुरू होते. पण नादिरशहाने पाठविलेल्या दूतमंडळाला सम्राट मुहम्मदशाहने संमती दिली नाही. एवढेच नव्हे तर दूतमंडळ मारले गेले. हा नादिरशहाला स्वतःचा भयानक अपमान वाटला. म्हणूनच त्याने भारतावर आक्रमण करण्याचे ठरविले. भारताच्या स्थितीची नादिरशहाला चांगलीच कल्पना होती. मुगल साम्राज्याची ढांसळती स्थिती आणि लष्करी दुर्बलता स्पष्ट दिसत होती. भारतात असलेल्या अमाप संपत्तीचेही नादिशहाला आकर्षण होते. महत्वाची गोष्ट म्हणजे अंतर्गत भांडणातून काही मुगल दरबाऱ्यांकडून नादिरशहाला भारतावर आक्रमण करण्यास उत्तेजित केले जात होते. ह्यानंतर नादिरशहाची विजयी घोडदौड सुरू झाली. ११ जून १७३८ रोजी गझनी ताब्यात घेतल्यावर २९ जूनला काबूलवर नादिरशहाचा अधिकार प्रस्थापित झाला. प्रत्यक्षात नादिरशहाचे आक्रमण होताच काबूलचा मुगल राज्यपाल नासिरखाने शरणागती पत्करली. तेंव्हा त्याच्याकडून एकनिष्ठ राहण्याचे वचन घेऊन नादिरशहाने त्यालाच काबूल व पेशावरचा राज्यपाल बनविले. त्यानंतर अटक येथे सिंधू नदी ओलांडून नादिरशहाने लाहोरच्या मुगल राज्यपालाला पराभूत केले. तेव्हा नासिरखाँप्रमाणेच तोही नादिरशहाला सामील झाला. एकामागोमाग विजय मिळवून नादिरशहा वेगाने दिल्लीकडे वाटचाल करीत असल्याचे पाहून सम्राट मुहम्मदशाह घाबरला. आता त्याला बस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली. म्हणून त्याने आपल्या मदतीसाठी निजाम, सादतखाँ, खानदौरान इ. ना घेतले व ८०,००० सैन्यासह दिल्लीहून कूच केली. मुगल सैन्य प्रचंड असले तरी त्यांच्याजवळ कोणतीही निश्चित अशी योजना नव्हती. नादिरशहाची स्थिती व नेमका ठावठिकाणा ह्यांची व्यवस्थित माहिती नव्हती. अशा स्थितीत कर्नालच्या तळावरून मुगल सैन्याने नादिरशहावर हल्ला केला पण बाजू त्यांच्यावरच उलटली. हया लढाईत मुगलांचे खूप नुकसान झाले. संघर्षात खान दौरान मारल्या गेला व सादतखाँला बंदी बनविण्यात आले. ह्याचवेळी सम्राटाने तडजोडीची भूमिका घेतली. त्याने नादिरशहाला 50 लक्ष रुपये देण्याचे कबूल केले. प्रत्यक्षात सम्राटाच्या वतीने हे कार्य निजामाने केले. त्यामुळे सम्राट इतका खूश झाला की, खानदौरानच्या मृत्यूनंतर रिकामे झालेले मीरबक्षीचे पद त्याने निजामाला दिले.
या तडजोडीत नादिरशहाने परत आपल्या देशात जावे असे ठरले होते, परंतु कदाचित इतिहासाला ते मंजूर नव्हते. देशहितावर वैयक्तिक स्वार्थाने व ईर्ष्येने मात केली.
मुगल सरदारांमधील हेवेदेवे, रागलोभ उफाकून आले. मीरबक्षी पदावर सादतखाँचा डोळा होता. परंतु ते पद सम्राटाने निजामाला दिल्याने संतप्त झालेल्या सादतखाँने नादिरशहाची भेट घेऊन त्याला दिल्लीवर आक्रमण करण्याची चिथावणी दिली व २० कोटी रू. मिळण्याचे आश्वासन दिले. नादिरशाहला मुगल दरबाराच्या स्थितीची पूर्ण कल्पना होती. ह्यला कंटाळूनच आपण दक्षिणेत गेलो असेही निजामाने कबूल केले होते. त्यामुळेच सादतखांचे निमंत्रण म्हणजे नादिरशहाला सुवर्णसंधी वाटली. त्याने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० मार्च १७३९ रोजी नादिरशहा आपल्या सैन्यासह दिल्लीला पोहचला. येथून जवळजवळ दोन महिने दिल्लीवर नादिरशाहाची सत्ता होती. त्याच्या नावाने खुत्बा वाचणे सुरू झाले व शिक्केही पाडण्यात आले. नादिरशहा दिल्लीलाच राहिला असता तर हीच मुगल साम्राज्याची समाप्ती ठरली असती. आपल्या मुककामात नादिरशहाने दिल्लीची जास्तीत जास्त लूट करण्याचा प्रयत्न केला. ह्या कार्यात अडथळा मानणाऱ्यांची सरेआम कत्तल करावी असा त्याचा आदेश होता. त्यामुळे झालेल्या नरसंहारात हजारोंचा बळी गेला. अमीरांनी व जनतेने स्वतः हून लूट आणून द्यावी असाही हुकूम नादिरशहाने काढला. अशाप्रकारे जवळजवळ दोन महिन्यानंतर नादिरशहा दिल्लीहून परत फिरला. जातांना कित्येक कोटी रु. नगद शिवाय सोने, चांदी, जडजवाहिर आपल्या सोबत आपल्या देशात घेऊन गेला. तसेच हत्ती, घोड़े, ऊंट हजारोंच्या संख्येने नेले. वेगवेगळे कुशल कारागीरही त्याने भारतातून नेले. शहाजहानचे प्रसिद्ध मयूरासन व जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ह्यावेळी नादिरशहा आपल्या देशात घेऊन गेला. काश्मीर व सिंधूच्या पश्चिमेकडील प्रदेश नादिरशहाला दिला. काही बंदरेही दिली. पंजाबच्या मुगल राज्यपालाने नादिरशहाला दरवर्षी २० लक्ष रु. कर देण्याचे कबूल केले तसेच सीमेवर शांतता ठेवण्याचे आश्वासन दिले. ह्याऐवजी भारतातून जाताना नादिरशहाने मुहम्मदशाहला पुन्हा मुगल साम्राज्याचा सम्राट घोषित करून त्याला त्याच्या नावाने खुत्बा वाचण्याचा व शिक्के पाडण्याचा अधिकार परत केला. जाताजाता नादिरशहाने मुहम्मदशाहला काही महत्वपूर्ण सूचना केल्या व सम्राटाची आज्ञा पाळावी असे आदेश दिल्लीच्या जनतेला दिले. संकट समयी दिल्लीला लष्करी मदत देण्याचेही नादिरशहाने कबूल केले. अहमदशहा अब्दाली नादिरशहाच्या लष्करात एक अधिकारी होता. नादिरशहाच्या भारत स्वारीत त्याने भाग घेतला होता. लष्कराचा चांगला अनुभव असलेल्या अहमदशहा अब्दालीने जून १७४७ मधे नादिरशहाला ठार केले व तो स्वतः अफगाणिस्थानचा शासक बनला. नादिरशहाने भारतात मिळविलेली प्रचंड संपत्ती आता अहमदशहा अब्दालीच्या ताब्यात आली. भारताच्या तत्कालीन राजकीय स्थितीचे, दरबारातील गटांचे व परस्पर संघर्षाचे त्याला चांगले ज्ञान होते. विशेषता रोहिल्यांशी अब्दालीचा संपर्क होता. अब्दालीची नजर प्रामूख्याने त्याच्या राज्याच्या पूर्व सीगेपलीकडील सुजलाम् सुफलाम् अशा पंजाबवर होती. म्हणून जानेवारी १७४८ मधे सीमा औलांडून त्याने पंजाबमध्ये प्रवेश केला. महत्त्वाचे लाहोर जिंकून घेतले पण त्याचा अब्दालीला फारसा लाभ मिळाला नाही. कारण सम्राट मुहम्मदशहाने पाठविलेल्या सैन्याने सरहिंदजवळ मनुपुर येथे अब्दालीला पराभूत केले. मात्र ह्या लढाईत मुगल वजीर कमरूद्दीन मारला गेला. मुगल सम्राट मुहम्मदशाह २५ एप्रिल १७४८ रोजी मृत्यू पावला. त्यांच्यानंतर त्याचा गुलगा अहमदशाह सम्राट बनला. त्याने वजीरपदी सफदरजंगची नियुक्ती केली. साफदरजंग अवधचा नवाबही होता. लवकरच सफदरजंग आणि दुआबमधील रोहिले यांच्यात संघर्ष उद्भवला. तेंव्हा रोहिल्यांना मदत करण्यासाठी अब्दाली भारतावर चालून आला. परंतु पंजाबच्या मुघल सुभेदाराने काही रक्कम देऊन अब्दालीशी तह केला व त्याला परत पाठविले.
अब्दाली अफगाणिरथानात परत गेला असला तरी सफदरजंग व रोहिले संघर्ष सुरूच होता. राजकीय कारणाबरोबर त्यांच्यातील परस्पर संघर्षाला धार्मिक कारणही होते. कारण सफदरजंग शिया पंथाचा तर रोहिले सुन्नी पंथाचे होते. ह्यावेळी उत्तर भारतात पेशवा बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची ताकद वाढत होती. म्हणून सफदरजंगने आपल्या मदतीसाठी
मराठ्यांना पाचारण केले. परिणामी दुआबमधे मराठे व रोहिले संघर्ष सुरू झाला. त्यात रोहिल्यांना जबर हानी सहन करावी लागली. म्हणून त्यांनी अब्दालीला बोलाविले. त्यानुसार १७५१ च्या अखेरीस अब्दाली पंजाबमध्ये दाखल झाला. अब्दालीचे दिल्लीवर होणारे संभाव्या आक्रमण लक्षात घेऊन सम्राट अहमदशाहने सफदरजंगला पुढे करून मराठयांशी एक करार केला. ह्या करारानुसार अब्दालीच्या आक्रमणाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी मराठ्यांनी पत्करली. त्याऐवजी त्यांना सम्राटाकडून दुआब, पंजाब व सिंध प्रदेशाचे चौथाईचे अधिकार मिळाले. मात्र मराठ्यांशी करार करत असतानाच भयग्रस्त सम्राटाने पंजाब अब्दालीला देऊन टाकला, परिणामी अहमदशहा अब्दाली आपल्या देशात निघून गेला. १ जून १७५४ रोजी वजीर गाजीउद्दीनने अहमदशहाला काढून त्याच्या जागी आलमगीर द्वितीयला सम्राट बनविले. दिल्लीत त्यामुळे गोंधळाची परिस्थिती होती. अशीच परिस्थिती पंजाबमध्ये निर्माण झाली. पंजाबचा सुभेदार मीर मन्नू याच्या मृत्यूनंतर त्याच्या लहान मुलाच्या वतीने मीर मन्नूची पत्नी मुगलानी बेगम पंजाबचा कारभार पहात असे. परंतु वजीर गाजिउद्दीनने पंजाबचा सुभेदार म्हणून आदिना बेगची नियुक्ती केली. त्यामुळे संतापलेल्या मुगलानी बेगमने
अहमदशहा अब्दालीला पाचारण केले व दिल्लीत असलेल्या गुप्त धनाच्या साठ्यांची माहिती पुरविली.
परिणामी नोव्हेंबर १७५६ मध्ये अब्दाली पंजाबमध्ये आला व तेथून दिल्लीच्या रोखाने जाऊ लागला. २८ जानेवारी १७५७ रोजी दिल्लीत प्रवेश केल्यापासून जवळजवळ १ महिना अब्दालीचा मुक्काम दिल्लीला होता. ह्यावेळी धन मिळविण्यासाठी अब्दालीने दिल्लीच्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले. दिल्लीजवळील मथुरा व दृंदावन येथेही अब्दालीच्या सैनिकांनी विध्वंस केला. हिंदूची कत्तल, मंदिरांचा विध्वंस, लूट असे प्रकार सर्रास चालत. शेवटी सैन्यात कॉलऱ्याची साथ पसरल्याने अब्दालीने हे आक्रमण आटोपते घेतले व मायदेशीचा रस्ता धरला. यावेळी
अब्दालीला कोटयावधीची लूट मिळाली. शिवाय चांगल्या प्रतिचे घोड़े, ऊंट, हत्ती त्याने स्वतः बरोबर नेले. परत जाताना मीरबक्षी पदावर अब्दालीने रोहिल्यांचा नेता नजीबखान रोहिल्याची नियुक्ती केली. नजीबखान मराठ्यांचा कट्टर शत्रू होता व दिल्लीच्या गादीवर त्याचा डोळा होता.

Tags
उपयुक्त माहिती