इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

महात्मा फुले

 


         महात्मा फुले यांचा जन्म इसवी सन 1828 मध्ये पुण्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत सुरू झाले. चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या शिक्षणात खंड पडला. पुन्हा 1841 मध्ये ते स्कॉटिश मिशनरी च्या इंग्रजी शाळेत जाऊ लागले. तेथे उच्चवर्णीयांची मुले त्यांच्या सहवासात आली. त्यांच्या आरंभीच्या मित्रपरिवारात काही मुसलमान मुले होती. त्यांच्या तोंडून हिंदू धर्मावर टीका ऐकून ज्योतिरावांना हिंदू धर्मातील अन्याय, उच्चनीच भाव, धर्माचरण यातील मतलबीपणा यांची पहिल्या प्रथम जाणिव झाली आणि आपला धर्मसंस्थेच्या अंतरंग न्यायनिष्ठुरपणा हे तपासून पाहण्याची गरज त्यांना वाटू लागलीह इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ जोतीरावांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना होती, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली. त्या शाळेतील उच्चवर्णीय मुलांशी त्यांच्या ओळखी झाल्या. त्यापैकी सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र होते. ज्योतिराव फुले यांच्यावर विद्यार्थीदशेतच ख्रिस्ती प्रणित मानवतावादाचा, ख्रिस्ती धर्म शिक्षकांच्या समर्पित जीवनाचा व कार्यपद्धतीचा प्रभाव पडला होता. त्यांचे सर्व शिक्षण स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत झाले. आपल्या विचारांची परिपक्वता कस कशी गेली यासंबंधी महात्मा फुले सांगतात पुण्यातील स्कॉच मिशनचे व सरकारी स्टेशनचे यांच्या योगाने मला थोडेबहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यमात्राच्या अधिकार कोणते हे समजले. ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापक व अधिकारी यांचे ऋण प्रांजळपणे त्यांनी मान्य केले आहे. ख्रिस्ती धर्म व दशकांनी होणार्‍या चर्चेतून जोतीरावांची धर्म जिज्ञासा जागृत झाली. ख्रिस्ती धर्मोपदेशक यांच्या समर्पित जीवनाचे त्यांना अगदी जवळून दर्शन होत होते. त्यांच्या कार्यक्षमतेचा व सेवाभावी वृत्तीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला  होता.  ज्योतिराव एक वर्षांचे असताना त्यांची आई वारली. सगुणा बाईंनी पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ केला. त्यांनी केवळ आरोग्याची काळजी घेतली असे नाही तर त्यांच्या मनावर त्यांनी मानवतावादाचे संस्कार केले. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची उपासना होय हे तत्त्व त्यांनी ज्योतिरावांना पटवून दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या ग्रंथांचा प्रभाव पडला होता. थॉमस पेन याने आपला धर्म, परमेश्वराचे एकत्व आणि मानवी समता या तत्वावर आपली श्रद्धा असल्याचे म्हटले होते. त्याच्या नावावर धर्माचा बाजार मांडला जातो हे सर्वांना आवश्यक आहे तसेच पाप मूलक व पाखंड पणाचे अशी त्यांची धारणा होती. पेन यांनी व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बुद्धिनिष्ठ तत्वांना आपल्या मत प्रतिपादन प्राधान्य दिले होते.

             इसवी सन 1848 पासून महात्मा फुले यांच्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ झाला. त्यांनी पुणे शहरात मुलींसाठी शाळा काढली ती फार दिवस चालली नाही. त्यानंतर त्यांनी तीन शाळा काढल्या होत्या. बुधवार पेठ, रास्ता पेठ, वेताळ पेठ या भागात या शाळा होत्या. या शाळेत अध्यापनासाठी एक स्त्री शिक्षकाची अशी गरज होती म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिले अध्यापिका केले. सावित्रीबाईंनी शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले होते. एक क्षुद्र स्त्री आपल्या पायरी सोडून वागते हे उच्चवर्णीयांना सहन झाले नाही  खुद्द जोतीरावांच्या माळी जातीतील लोकांना ही आवडले नाही. या सर्वांनी जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणले व फुले पती-पत्नीला घराबाहेर काढले. हाती घेतलेले कार्य सोडून देण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी त्यांना शिक्षण विषयक कार्य अत्यंत धैर्याने साथ दिली. घरचा आधार तुटल्याने फुले यांनी उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र व्यवसाय बघावा लागला. त्यामुळे त्यांनी काढलेली शाळा काही काळासाठी बंद पडली. पुढे स्थिरस्थावर झाल्यावर तीन वर्षांनी पुन्हा त्यांनी पुण्यातच तीन शाळा काढल्या. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई जाणवे. अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असत. हे विचारात घेऊन महात्मा फुले यांनी स्वतः ची पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून दिली. त्या काळाचा संदर्भ पाहता ही बाब क्रांतिकारकच होती.
             सत्यशोधक समाजाला फार मोठा बुद्धिमत्ताचा पाठिंबा होता असे नव्हे तर सामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रसाराची स्थाने म्हणजेच सभा, बैठक व धान्य मिळण्याचे ठिकाण एक घोंगडी, पागोटे व धोतर. सत्यशोधक कार्यकर्त्यांचा होता. सत्यशोधक समाजाचे प्रचारक हे आपल्या भाषणात शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कमी खर्चातील ब्राह्मणांच्या गैरहजेरीत लग्न, धर्मवीर यातून शेतकऱ्यांची सुटका, शिक्षणाचे महत्त्व आदी गोष्टी सांगत असत. सत्यशोधक समाजाने शूद्रातिशूद्र स्त्रिया, शेतकर्‍यांची दुर्दशा दूर करण्यासाठी शिक्षणावर भर दिला होता. सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवून घेतले व दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. सत्यशोधक समाजाच्या वतीने पुण्याजवळ हडपसर येथे एक शाळा काढली होती. त्यांची मुले शाळेत जावेत म्हणून सत्यशोधक समाजाच्या वतीने पट्टेवाला ठेवला होता. सत्यशोधक समाजाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवली गेली. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या गेल्या, सहभोजनाचे कार्यक्रम हाती घेतले गेले, निबंध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال