इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

पेशवा बाळाजी बाजीराव


         पेशवा बाजीराव प्रथमचा मृत्यू आकस्मिक असाच होता. त्यानंतर शाहूने बाजीरावचा मोठा मुलगा
बाळाजी यांस पेशव्याची जागा दिली. पैशवेपद आता वंशपरांपरागत बनले होते. पण येवढेच अत्यंत महत्वाचे बनले होते. बाजीरावने आपल्या कारकीदींत केलेल्या विजयी लढायांमुळे मराठा सत्तेचा प्रसार भारतात दूरदूरपर्यंत होऊन मराठ्यांचा सर्वत्र दबदबा निर्माण झाला. आपल्या या तेजस्वी कार्याने बाजीराव मराठा राज्याचा वास्तविक शासक बनला होता. त्यामुळेच पेशवेपदावर आलेल्या बाळाजीची जबाबदारी अधिकच वाढली. त्याला पित्याच्याही पुढे जाणे, अधिकाधिक मराठा सत्तेचा प्रसार
व विकास घडवून आणणे क्रमप्राप्त होते. बाळाजीचे वयही पेशवेपद मिळाले तेव्हा बाजीरावसारखे १९ वर्षे होते. अनेक युद्धमोहिमांमधे त्याने भाग घेतला होता. विशेषतः प्रशासकीय कामकाजात व हिशोबात तो जास्त तरबेज होता. राज्याची आर्थिक बाजू पाहून नव्या पेशव्याने राज्य सुदृढ आर्थिक पायावर उभे करण्याचा चंग बांधला. माळव्याचे अधिकार अजूनही मराठ्यांना मिळाले नव्हते. त्यादृष्टीने तसेच नर्मदोत्तर प्रदेशातून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने बाळाजीने ताबडतोब मोहीम काढली. त्यात मल्हारराव होळकरने माळव्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे धार जिंकल्याने सम्राट अस्वस्थ झाला. त्याच्याच सूचनेनुसार जयपूर शासक सवाई जयसिंहाने बाळाजीची भेट घेऊन त्याला सम्राटाकडून माळव्याचे अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार १७४१ मधे माळव्याची सनद मराठ्यांना मिळाली. अत्यंत महत्वाचा असा माळवा पहिल्याच झटक्यात मिळाल्याने मराठ्यांमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पेशवा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याने आपले लक्ष बुंदेलखंडवर केंद्रीत केले. दिल्लीच्या राजकारणात भाग घेणाऱ्यांना भारताच्या मध्य भागात असलेल्या माळवा व बुंदेलखंडवर
नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. कारण तेथून चौफेर नजर ठेवता येत होती. बुंदेलखंडातील ओरछाचा शासक वीरसिंह बुंदेला मराठ्यांना चौथाई देण्याची टाळाटाळ करीत होता. एवढेच नव्हे तर त्याचा मराठा सैन्याच्या एका तुकडीशी संघर्षही झाला. त्यात राणोजी शिंदेचा मुलगा ज्योतिबा मारला गेला. मात्र नंतर नारोशंकरच्या नेतृत्वात मराठ्यांनी
विरसिंहास पराभूत केले. परिणामी त्याने शरणागती पत्करली. तेंव्हा त्याच्याकडून झांशी घेऊन ओरछा विरसिंहास परत करण्यात आले. यापलीकडील काळात झांशी है मराठ्यांचे मध्य भारतातील शक्तीशाली लष्करी केंद्र बनले. अशाच प्रकारचा लष्करी तळ सागर येथे उभारण्यात आला. त्याचबरोबर मराठा वर्चस्वाला विरोध करणाऱ्या चंदेरी, कालिंजर इ. शासकांना धडा शिकवून त्यांना आपली सत्ता मान्य करण्यास मराठ्यांनी भाग पाडले.
        ‌‌ बाळाजी बाजीराव पेशवा झाला त्याचवर्षी दक्षिण भारतात काही समस्या निर्माण झाली. कर्नाटकाचा
नवाब दोस्तअली तंजावर राजा प्रतापसिंह भोसलेस त्रास देऊ लागला. म्हणून प्रतापसिंहने शाहूकडे मदत मागितली. पेशवा यावेळी माळवा मोहीमेत व्यस्त असल्याने दक्षिण भारतची जबाबदारी शाहूने रघुजी भोसलेकडे सोपविली. रघुजीने नवाब दोस्तअलीला पराभूत करून ठार मारले. कर्नाटकातील या यशस्वी कामगिरीमुळे रघुजी भोसलेची प्रतिष्ठा वाढली. या मोहीमेनंतर रघुजीने बंगालवर स्वारी करण्याचे ठरविले. बंगालमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत
संघर्षाचा फायदा घेऊन तेथे मराठा सतेचा प्रसार करणे रघुजीचे उद्दिष्ट होते. बंगालचा मुगल सुभेदार सर्फराजखां यास ठार करून अलीवर्दीखान बंगाल प्रांताचा स्वतंत्र नवाब बनला. त्याल विरोध करण्याचे ठरवून मीर हबीब नावाच्या सरदाराने रघुजीला मदत मागितली. त्यानुसार रघुजीने आपला मंत्री भास्करराव कोल्हटकर यास पाठविले पण या स्वारीत मराठ्यांना फारसे यश मिळाले नाही. म्हणून  स्वतः रघुजी बंगालमधे गेला त्यावर अलीवर्दीखानाने पेशव्याला मदत मागितली. येथूनच पेशवा व रघुजी भोसले यांचे संबंध बिघडायला प्रारंभ झाला. तेंव्हा शाहूने समझौता घडवून आणून वऱ्हाडच्या पूर्वेकडील प्रदेश रघुजीचे कार्यक्षेत्र राहील असा निर्णय दिला. त्यानुसार बंगालची चौथाई वसूल करण्यासाठी भास्करराम कोल्हटकर पुन्हा तेथे गेला पण अलीवर्दीखानाने विश्वासघाताने त्याला ठार केले. याच सुमारास बंगालमधे गोंधळाचे वातावरण पसरले. नवाब अलीवर्दीखानाविरुद्ध त्याच्या सेनापतीने बंड केले. परिस्थितीचा फायदा घेत रघुजीने पुन्हा बंगालवर स्वारी केली. अखेर अलीवर्दीखानाने रघुजीशी तह करून बंगालच्या चौथाईपोटी भोसल्यांना दरवर्षी १२ लक्ष रु.
देण्याचे कबूल केले.
            मे १७४८ मधे निजाम-उल-मुल्क मृत्यू पावला. त्यानंतर त्याच्या मुलांमधे सत्ता संघर्ष सुरू झाला.
त्यात हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगला फ्रेंचांची मदत होती. प्रसिद्ध फ्रेंच सेनानी बुसी त्याच्या
मदतीला होता. सता हस्तगत केल्यावर सलाबतजंगने पेशव्याशी करार करून  काही रक्कम देण्याचे कबूल केले. त्याऐवजी पेशव्याने हैद्राबादच्या सत्तासंघर्षात तटस्थ रहावे असे ठरले. प्रत्यक्षात मात्र उरलेली रकम न मिळाल्याने बाळाजी बाजीरावने सलाबतजंगविरुद्ध शस्त्र उपसले. परस्पर चकमकी होण्यास प्रारंभ झाला. फ्रेंचांजवळ आधुनिक तोफखाना असल्याने बुसी विजय मिळेलच या गुर्मीत होता. अशा स्थितीत औरंगाबादजवळ मराठ्यांनी सलाबतजंग व बुसीला अडचणीत पकडले. परिणामी शरणागती पत्करून सलाबतजंगने मराठ्यांशी भालकीचा तह केला. या तहानुसार हैद्राबाद राज्यातील वऱ्हाड व खानदेश मराठ्यांना मिळाले. यापुढील काळात राज्यातील बुसीचा हस्तक्षेप वाढत गेल्याने सलाबतजंगने बाळाजीशी संपर्क प्रस्थापित केला. मात्र याच सुमारास कर्नाटकात इंग्रज व फ्रेंच संघर्ष सुरू झाल्याने बुसीला तेथे बोलावून घेण्यात आले. मात्र सलाबतजंगचा लहान भाऊ निजामअली शक्तीशाली बनल्याने राज्यात पुन्हा गोंधळ सुरू झाला. संधीचा फायदा घेत पेशव्याने आपला चुलत भाऊ सदाशिवरावभाऊस  निजामाविरुद्ध पाठविले. सोबत पेशव्याचा मोठा मुलगा विश्वासराव होता. शिवाय इब्राहिमखान गारदीच्या नेतृत्वात तोफखाना होता. मराठ्यांच्या या सैन्याला निजामअलीने जोरदार प्रतिकार केला. तेव्हा झालेल्या उद्गीरच्या लढाईत निजामअली
पराभूत होऊन मराठ्यांशी तह करण्यास बाध्य झाला. तहानुसार मराठयांना ६० लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाच
प्रदेश मिळाला शिवाय निजामाच्या राज्यातील दौलताबाद, विजापूर अशी महत्वाची शहरे मराठ्यांना मिळाली.
             मुगल सम्राटांच्या दुर्बलतेमुळे विघटनकारी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळाले. अहमदशहा अब्दालीच्या
सहाय्याने दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करण्याची पठाण व रोहिल्यांची महत्वाकांक्षा होती. अब्दालीच्या आक्रमणाने भयभीत होऊन सफदरजंगने मराठ्यांना मदत मागितली. १७५२ च्या करारानुसार मुगल साम्राज्याचे अंतर्गत व बाह्य शत्रूपासून रक्षण करण्याचे मराठ्यांनी कबूल केले. त्याऐवजी मराठ्यांना ५० लक्ष रु. पंजाब, सिंध व दुआब प्रदेशाचे चौथाईचे अधिकार मिळाले. शिवाय आग्रा व अजमेरची सुभेदारी मिळाली. मात्र हा करार झाल्यानंतरही अब्दालीला खुष करण्यासाठी सम्राटाने त्याला पंजाब देऊन टाकले. नोव्हेंबर १७५६ मध्ये अब्दली पुंन्हा पंजाबमध्ये आला. त्यानंतर जानेवारी १७५७ मधे त्याने दिल्लीत प्रवेश केला. यावेळी दिल्ली, मथुरा, वृंदावन, गोकूळ येथील हिंदू जनतेवर अब्दालीच्या सैनिकांनी नानाप्रकारचे अत्याचार केले, कतल केली, मंदिरांचा विध्वंस केला. त्यानंतर अब्दाली भारतातून परत गेला. त्याच सुमारास रघुनाथरावच्या नेतृत्वारखाली पेशव्याने पाठविलेले मराठा सैन्य उत्तरेत आले. या सैन्याने दिल्ली जिंकून पंजाबमधे विजयकार्य सुरू केले व अटकपर्यंतचा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला. एवढे कार्य केल्यावर मे १७५८ मधे रधुनाथराव दक्षिणेत परत निघाला. मराठ्यांनी पंजाब जिंकणे म्हणजे अब्दालीसाठी मोठेच आव्हान होते. नजीबखान रोहिला त्याला सतत भारतात येण्यासाठी आग्रह करीत होता. त्यानुसार १४५९ मध्ये अब्दाली पुंन्हा भारतात आला. त्याला पंजाबमधेथ रोखून धरण्याचा आटोकाट प्रयत्न मराठा सरदार दत्ताजी शिंदेने केला. पण बरारीघाटजवळ झालेल्या संघर्षात स्वतः दत्ताजी मारल्या गेला. ही घटना कळताच पेशवा बाळाजी बाजीरावने सदाशिवराव भाऊच्या नेतृत्वाखाली एक सैन्य उत्तरेत पाठविले. शेवटी मराठे व अब्दाली यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध होऊन त्यात मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. परिणामी उत्तर भारतात मराठा सत्ता निर्माण करण्याच्या मराठ्यांच्या प्रयत्नांना एकदम खीळ बसली.
          बाळाजी आपल्या सौम्य व्यक्तीमत्वासाठी प्रसिद्ध होता. न्यायपद्दतीत त्याने अनेक सुधारणा केल्या. त्याकाळात फौजदारी न्यायालय जनतेच्या अधिकारांचे संरक्षक बनले होते. शेतीवरील करातही सुधारणा करण्यात आली. सर्व गोष्टींचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे सुरू झाले. गुन्हेगारांना, समाजकंटकांना शिक्षा देण्यासाठी खास प्रबंध होता. व्यापाराला उत्तेजन देण्यात आले. नवे राजमार्ग तयार करण्यात येऊन कडेला वृक्ष लावण्यात आले. मंदिरांचे निर्माण कार्य झाले व त्याच्या व्यवस्थेचा प्रबंध करण्यात आला. एकूण जनतेची स्थिती सुधारल्याने जनता बाळाजीला धन्यवाद देऊ लागली.

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال