पेशवा बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी बाळाजीचा मोठा मुलगा विसाजी उर्फ बाजीराव यांस पेशवा बनविले. हेच इतिहासात बाजीराव प्रथम किंवा थोरला बाजीराव म्हणून प्रसिद्ध आहेत. पेशवेपद मिळाले त्यावेळी बाजीरावाचे बय १९ वर्षे होते. मात्र त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. त्याचवर्षी दक्षिणेत पुन्हा आलेला निजाम मराठ्यांना डोकेदुखी ठरला. त्याने दक्षिण सुभ्याचे मराठ्यांना मिळालेले चौथाई सरदेशमुखीचे अधिकार शाहूंना देण्याचे नाकारले. उलट मराठ्यांमधे फूट पाडण्यासाठी कोल्हापूरचे संभाजी द्वितीय यांचे समर्थन केले. पश्चिम किनाऱ्यावरील सिद्दी, पोर्तुगीज मराठ्यांचे शत्रू होते. या अडचणीवर मात करून पित्याने घालून दिलेल्या आदर्शावर पुढे पाऊल टाकणे व संपूर्ण भारतात मराठा सतेचा प्रसार करणे बाजीरावाचे ध्येय होते. वय कमी असले तरी बाजीराव तीव्र बुद्धिमत्तेचा होता. अद्वितीय घोडेस्वार म्हणून त्याचा नावलौकीक होता. नेतृत्वाचे गुण त्याच्यात जन्मजात होते. परकीयांना भारतातून घालवून देण्याची वेळ आलेली आहे. मुगल साम्राज्याच्या वठलेल्या वृक्षाच्या बुंध्यावर आघात केला म्हणजे फांद्या आपोआप पडतील व मराठ्यांचे राज्य कृष्णा ते अटकेपर्यंत पसरेल या आपल्या विचाराने बाजीरावाने शाहूंना प्रभावित केले. आपली निवड अचूक ठरली याचा शाहूंना आनंद झाला. बोलल्याप्रमाणे बाजीराव कर्तृत्व गाजविल्याशिवाय रहाणार नाही याबद्दल शाहूंना तिळमात्र संशय नव्हता. म्हणूनच त्यांनी बाजीरावाचे समर्थन करून त्याच्या वीरवृत्तीला उत्तेजन दिले. जून्या सरदारांचा आपल्याला विरोध आहे याची पूर्ण कल्पना असलेल्या बाजीरावाने शिंदे, होळकर, रेटरेकर, पुरंदरे, पवार अशी नवी तरुण रक्ताची सरदार मंडळी तयार केली. समोरासमोर लढण्यापेक्षा बाजीरावाने गनिमी कावा पद्धतीने लढत केल्या. कारण मराठा तोफखाना कमकुवत आहे आणि मुगलांसमोर तो टिकणार नाही याची जाणीव होती. बाजीरावाला त्याच्या प्रत्येक कार्यात त्याचा लहान भाऊ चिमाजी अप्पाची पूर्ण साथ होती. बाजीरावाचे आणखी एक मुत्सद्दीपणाचे धोरण म्हणजे हिंदूपदपातशाहीचा केलेला पुरस्कार होय.
निजाम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आला. आल्याबरोबर त्याने एका बाजूला कोल्हापूरच्या संभाजी द्वितीयला चिथावणी दिली. त्यामुळे संभाजींनी स्वतःला छत्रपती घोषित केले. दुसऱ्या बाजूने निजामाने घोषणा केली की मराठ्यांचे दोन छत्रपती आहेत. त्यामुळे दक्षिण सुभ्यातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार कोणाला द्यावे? अशा स्थितीत निजामाची भेट घेऊन त्याला समजविण्याचा बाजीरावाने प्रयत्न केला. पण या कार्यात यश मिळाले नाही. परिस्थिती चिघळू लागल्याचे पाहून शाहूंनी बाजीरावास कर्नाटकातून बोलावून घेतले. ह्यावेळी मात्र बाजीरावाने समझौत्याचे धोरण न ठेवतः मनगटाच्या बळावर निजामाला धडा शिकविण्याचे ठरविले. त्यामुळे परस्पर संघर्ष सुरू झाला. अखेर औरंगाबादजवळ पालखेड येथे बाजीरावाने निजामाला कोंडीत पकडले, म्हणून शरणागती पत्करून निजामाने मुंगी शेवगावचा तह केला. दक्षिणच्या सहा सुभ्यातील चौथाई, सरदेशमुखीचे अधिकार शाहूंना देण्यास निजामाने मान्यता दिली. यापलीकडे निजाम संभाजींचे समर्थन करणार नाही. मधल्या काळात पुणे इ. प्रदेशात निजामाने जिंकलेले प्रदेश मराठ्यांना परत केले. युद्धकैद्यांची मुक्तता करावी. बाजीरावाचा निजामावरील विजय अतिशय महत्वाचा ठरला. त्यामुळे दक्षिण भारतात मराठे निःसंशय श्रेष्ठ व शक्तिशाली बनले. आता उत्तरेच्या राजकारणात भाग घेण्याची मोकळीक बाजीराला मिळाली. निजामासारख्या मुगल साम्राज्यातील सर्वात बलाढ्य मानल्या गेलेल्या शत्रूला सहज नमविल्याने सर्वत्र बाजीरावाची प्रतिष्ठा वाढली. समझौत्यापेक्षा तलवारीचेच धोरण योग्य हे सिद्ध झाले.
भारताचा युरोप व आफ्रिकेशी होणार व्यापार गुजरातमधून होत असे. गुजरात त्यावेळी समृद्ध प्रदेश
होता. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात औरंगजेबाला प्रतिशह देण्यासाठी मराठ्यांनी मुगल प्रदेशांवर हल्ले सुरू केले. त्यात गुजरातही होता. पुढे मराठ्यांनी तेथून चौथाई वसूल करणे सुरू केले. पण त्याला गुजरातचे मुगल सुभेदार विरोध करीत. म्हणून बाजीरावने गुजरातमध्ये फौजा पाठविल्या. त्यात झालेल्या संघर्षात मुगल सुभेदार सरबुलंदखान पराभूत झाल्याने त्याने मराठ्यांचे चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार मान्य केले मात्र या प्रकरणातून पेशवा व सेनापती संघर्ष निर्माण झाला. सेनापती
खंडेराव दाभाडेकडे गुजरातची व्यवस्था होती. त्याला वरील घटना आपल्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण
वाटले. १७२९ मधे खंडेरावचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा त्रिंबकराव यास सेनापती बनविण्यात आले. पण त्रिंबकरावने निजाम, महंमद बंगश इ. बाजीरावच्या विरोधकांशी संधान बांधून पेशव्यांविरुद्ध फार मोठे
कारस्थान चालविले. त्याची ही राज्यहितविरोधी प्रवृत्ती पाहून बाजीरावाने शस्त्र उपसले. त्यावेळी झालेल्या डभईच्या लढाईत सेनापती त्रिंबकराव दाभाडे मारल्या गेला. यानंतर बाजीरावाला कोणीही अंतर्गत प्रतिस्पर्धी उरला नाही. उत्तर व दक्षिण भारतातील आवागमनाचे मार्ग माळव्यातून जात असल्याने सर्व दृष्टींनी माळव्याचे
स्थान अनन्यसाधारण महत्वाचे होते. औरंगजेबाच्या काळापासूनच मराठ्यांचे माळव्यावर लक्ष होते. उत्तर भारतात राज्यविस्तार करण्यासाठी लष्करी दृष्टीने माळव्यावर नियंत्रण अत्यावश्यक होते. शिवाय त्यामुळे निजामाचा दिल्लीशी संबंध तोडता येणार होता. म्हणूनच शिंदे, होळकर, पवार या बाजीरावाच्या सरदारांनी माळव्यात शिरून चौथाई वसूल करणे सुरू केले. मराठ्यांच्या या प्रयत्नाला राजपूतांचे विशेषतः जयपूर शासक सवाई जयसिंहाचे सहकार्य होते. त्यापुढील टप्पा म्हणजे माळव्यावर मराठ्यांचे नियंत्रण प्रस्थापित करणे होय. त्यासाठी बाजीरावाने चिमाजी अप्पास पाठविले व स्वतः आवश्यकता भासल्यास मागे राहिले. १७२८ मध्ये निजामाने अमझेराच्या लढाईत माळव्याचा मुगल सुभेदार गिरीधर बहादुरला पराभूत केले या संघर्षात गिरीधर मारल्या गेला. त्यामुळे माळव्यावर मराठा नियंत्रण प्रस्थापित झाले. याच सुमारास बुंदेलखंडमधे समस्या निर्माण झाली. शूर बुंदेल्यांनी औरंगजेबाला जबरदस्त टक्कर दिली होती. बुंदेलखंड अलाहाबादच्या मुगल सुभ्यात असला तरी प्रत्यक्षात तेथे छत्रसाल बुंदेला शासन करीत होता. मात्र १७२८ मध्ये अलाहाबादचा सुभेदार झालेल्या महंमद बंगशने बुंदेलखंडावर हल्ला चढविला त्यात वयोवृद्ध छत्रसाल पराभूत होऊन जैतपूरच्या किल्ल्यात अडकला. तेंव्हा त्याने बाजीरावाला मदत मागितली. त्यानुसार बाजीरावने बुंदेलखंडात धाव घेऊन महंमद बंगशची रसद तोडली व त्याला शरणागती पत्करावयास लावले. परिणामी छत्रसालची मुक्तता झाली. या कामगिरीवर खूष होऊन छत्रसालने बाजीरावला बुंदेलखंडातील सागर, झांशी, काल्पी इ. दिले. याचा बाजीरावला खूप फायदा झाला कारण बुंदेलखंड दिल्लीला जवळ असल्याने बाजीरावने आपल्याला मिळालेल्या प्रदेशात मराठ्यांची शक्तीशाली लष्करी केंद्रे उभारली. तेथून चहुबाजूला नजर ठेवणे सोईचे होते.
निजामाला वठणीवर आणल्यानंतर तसेच माळवा व बुंदेलखंडात पाय ठेवायला मराठ्यांना जागा मिळाल्यानंतर बाजीराव फांद्या तोडीत बसण्यापेक्षा बुंध्यावर आघात करणे या आपल्या धोरणानुसार दिल्लीलाच शह देण्याचे ठरविले. त्याआधी बाजीरावने निजामाची भेट घेऊन त्याच्याकडून आश्वासन घेतले की बाजीरावच्या उत्तर मोहीमेत निजाम तटस्थ राहील. नंतर बाजीरावने राजपूत राजांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून उत्तर स्वारीत त्यांचा अडथळा होणार नाही याची काळजी घेतली. पहाता पहाता मराठा फौजा चंबळपर्यंत जाऊन पोहोचल्या. तेथून बाजीरावने काही सैन्य मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वात दुआबमधे पाठविले. अवधचा सुभेदार सादतखाां याला गुंतवून ठेवणे बाजीरावाचे उद्दिष्ट होते. यावेळी झालेल्या संघर्षात सादतखांकडून होळकर पराभूत झाले असले तरी त्याचवेळेस बाजीराव एकदम दिल्लीला जाऊन धडकले. त्यांना अडथळा आणणाच्या मुगल सरदार अमीरखानचा मराठ्यांनी धुव्वा उडविला. त्यामुळे दिल्ली शहरात सर्वत्र घबराट पसरली. ही घटना २९ मार्च १७३७ मधील होय. दिल्ली सम्राट दिल्ली सोडून जाणाच्या तयारीत होता त्याच सुमारास सादतखां इ. सरदार दिल्लीला धावून आले. आपले कार्य झाल्याने बाजीराव माघारी परतला. आपली अडचणीची स्थिती पाहून सम्राटाने निजामाला दिल्लीला बोलावून घेतले. बाजीरावला दिलेले आश्वासन मोडून निजामही दिल्लीला गेला. बादशहाने त्याचा मोठा सत्कार केला व त्याला आसफजहाँ असा किताब दिला. बाजीरावने मात्र निजामाला धक्का देण्याचे ठरविले. उत्तरेतून परतणाऱ्या निजामाला कल्पनाही न येऊ देता बाजीरावने भोपाळजवळ कोंडीत पकडले. त्यावेळी झालेल्या भोपाळच्या लढाईत टिकाव न लागल्याने निजामाने बाजीरावसमोर शरणागती पत्करून त्यांच्याशी तह केला. त्यानुसार मराठ्यांना माळव्याचे अधिकार सम्राटाकडून मिळवून देण्याचे निजामाने कबुल केले. नर्मदा ते यमुना प्रदेशावर मराठ्यांचे नियंत्रण मान्य केले. शिवाय युद्धखंडणी म्हणून ५० लक्ष रुपये मराठ्यांना देण्याचेही कबूल केले. मराठ्यांच्या शक्तीशाली आरमारामुळे जंजिऱ्याचा सिद्दी मराठ्यांचा द्वेष करीत असे. प्रामुख्याने नौदलप्रमुख कान्होजी आंगरे सिद्दीच्या डोोळ्यत खूपत होता. कारण कान्होजीमुळेच सिद्दीचे मनसुबे यशस्वी होत नव्हते. अशाही स्थितीत बाजीराव निजामाशी संघर्ष करण्यात गुंतलेला पाहून सिद्दीने कोकण किनारपट्टीत बराच गोंधळ माजविला. ब्रह्मोद्स्वामी नावाचा सत्पुरुष चिपळूणच्या परशुराम मंदिराची व्यवस्था पहात असे. १७२७ मधे गोवळकोट व अंजनवेलच्या सिद्दीने परशुराम मंदिराचा विध्वंस केला. म्हणून बाजीरावने सिद्दींबरोबर मोहीम सुरू केली. त्यात चिमाजी अप्पाने गोवळकोट व अंजनवेलचा सिद्दी सात ह्याला ठार केले. मात्र जंजिऱ्याच्या सिद्दीला पराभूत करण्यात बाजीरावला यश मिळाले नाही. सिद्दीप्रमाणेच पश्चिम किनान्यावरील पोर्तुंगीजही मराठ्यांना त्रास देत. हिंदूवर अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने खिश्चन बनवीत. कान्होंजी आंगरेच्या मृत्यूनंतर आंगरे घराण्यात निर्माण झालेल्या भाऊबंदकीचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग सुरू केला. तेंव्हा पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे कार्य बाजीरावने चिमाजी अप्पाकडे सोपविले. त्याप्रमाणे चिमाजी अप्पानी पोर्तुगीज केंद्र असलेले ठाणे जिंकून साष्टीवरही ताबा मिळविला, मात्र वसई जिंकायला चिमाजी अप्पा बरेच परिश्रम घ्यावे लागले.
नर्मदातिरी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावाचा अकस्मात मृत्यू झाला. बाजीराव जन्मजात योद्धा होता. गतिशिलता व तीव्र गती त्याच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्टे होती. आपल्या २० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी कितीतरी लढाया जिंकल्या. मराठा तोफखान्याची कमजोरी माहीत असल्यामुळे तो शत्रूला समोरासमोर टक्कर देण्याऐवजी, अडचणीत पकडणे, रसद मारणे अशा
गनिमी काव्याचा अवलंब करीत असे. अचानक हल्ला करून शत्रुची भंबेरी उडवून देण्यात बाजीराव
वाकबगार होता. दूरदर्शी असलेला बाजीराव आपला कार्यक्रम योजनाबद्ध रितिने पार पाडीत असे. त्याची
उत्तर मोहीम त्याचे खास उदाहरण आहे. अत्यंत मुल्सद्दीपणाने बाजीरावने तत्कालीन राजपूत राजे, बुंदेले,
हिंदू राजे यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. आपल्या राज्यवर्धिष्णू कार्यासाठी नवी तरुण तडफदार सरदारमंडळी तयार केली व त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून स्वतंत्र जबाबदारी सोपविली. महाराष्ट्राबाहेर मराठा सत्तेचा प्रसार करण्याचे श्रेय बाजीरावकडेच आहे. निजाम, संभाजी द्वितीय, त्रिंबकराव दाभाडे, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, मुगल सुभेदार व सरदार अशा अनेक अडचणीवर मात करून बाजीरावने हिंदूपदपातशाहीच्या दृष्टीने मोलाचे ऐतिहासिक कार्य केले. मराठ्यांचे राज्य अरबी सागरापासून बंगालच्या खाडीपर्यंत पसरले होते आणि भारतीय नकाशात जागोजागी मराठ्यांची शक्तीकेंद्रे होती.

Tags
उपयुक्त माहिती