इयत्ता पहिलीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात
आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा
पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट
सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला
सराव होण्यास मदत होईल. पहिली APP डाऊनलोड
कथा वाचा.
छोटासा प्रयत्न
एके दिवशी मंगेश सकाळी सकाळी समुद्रकिनारी रपेट मारत होता. तेव्हा किनार्यावर अचानक त्याला अनेक स्टारफिश दिसले. शेकडो स्टारफिश वेगवान लाटांसोबत पाण्यातून बाहेर येत होते, मात्र ते जिवंत होते. दुपारी कडक उन्हात ते मरून जातील, असा विचार करून मंगेश एकेक करून स्टारफिश उचलून समुद्रात टाकू लागला. ते पाहून तेथून जाणार्या दुसर्या एका माणसाला नवल वाटले. मंगेश असे का करत आहे? असा विचार त्याच्या मनात आला. तो मंगेशला म्हणाला, ‘या ठिकाणी शेकडो स्टारफिश पडलेले आहेत, तू किती माशांना मदत करू शकशील.’ त्यावर मंगेशने त्याच्याकडे न पाहताच आणखी मासा उचलला आणि समुद्रात टाकत म्हणाला, ‘माझा हा छोटासा प्रयत्न त्या माशासाठी खूप महत्त्वाचा आहे.’
Tags
पहिली गणित