अ.क्र | पाठाचे नाव | टेस्ट सोडवा |
---|---|---|
1 | वारली चित्रकला | सोडवा |
2 | माय | सोडवा |
3 | आपले परमवीर | सोडवा |
4 | पण थोडा उशीर झाला | सोडवा |
5 | बाकी वीस रुपयांचं काय | सोडवा |
6 | गवतफुला रे गवतफुला | सोडवा |
7 | डॉक्टर कलाम यांचे बालपण | सोडवा |
8 | सायकल म्हणते मी आहे ना | सोडवा |
9 | बलसागर भारत होवो | सोडवा |
10 | आपली सुरक्षा आपले उपाय | सोडवा |
11 | सुगंधी सृष्टी | सोडवा |
12 | माझ्या आज्यानं पंज्यानं | सोडवा |
13 | मला मोठं व्हायचंय | सोडवा |
आठवीची वार्षिक परीक्षा अगदी चार आठवड्यांवर येऊन ठेपली होती. एका संध्याकाळी माझ्या वर्गातली ऊर्मिला देशपांडे घरी आली. ऊर्मिला घरातल्या भावंडातील सर्वांत मोठी ! खाली चार-पाच लहान भावंडं. तिला आईलाही घरकामात बरीच मदत करावी लागत असे. त्यामुळे घरी अभ्यासास फारसा वेळ मिळत नसे. बुद्धीनंही ती सर्वसाधारणच होती. ती आली अन् म्हणाली, “इंदुमती, मला भूमिती जरा अवघड वाटतं, मला जरा तुझी मदत हबी आहे. परीक्षा तर अगदी जवळ आलीये. करशील मदत ?"' मी 'हो' म्हटलं. ““काय करू मदत ? रोज तुला मी काही समजावून देऊ का ?"' मला त्या वेळेपासूनच इतरांना समजावून द्यायला भारी आवडत असे. कदाचित तीच माझ्यामधल्या 'शिक्षका'ची सुरुवात असावी. शिक्षकी पेशाचं एक चिमुकलं अन् दाणेदार बीज त्याच वेळी माझ्या मनात रुजत असावं. खरंतर शिक्षकी पेशा आमच्या घरात वंशपरंपरेनंच चालत आलेला होता. मी ऊर्मिलाला रोज मार्गदर्शन करीन म्हटलं, होकार दिला. मला थांबवत ती म्हणाली, “'तू तुझा वेळ नको घालवूस.'*'अग, तुला समजावून देताना माझाही आपोआप अभ्यास होईलच की! तुला समजावून देण्यासाठी मलाही रोज तयारी करावी लागेल. तोच माझा अधिकचा अभ्यास होईल.'' पुढे शैक्षणिक तत्त्वांचा अभ्यास करताना एक सिदूधान्त बाचण्यात आला.
'एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं, म्हणून शिकवता शिकवता शिका.'' खरंतर मी शिकवायला तयार होते. कुठूनतरी मला खूप छान वाटत होतं. 'कदाचित फूल होताना कळीला असंच वाटत असावं. उमलण्याचा आनंद ! गंध उधळण्याचा आनंद !! ती जरा चाचरतच म्हणाली, “'त्यापेक्षा असं कर, तुझी भूमितीची खास वही मला दोन-चार दिवस घरी अभ्यासास दे. मी काही लिहून घेईन. काही वाचून लक्षात घेईन.' तिनं मांडलेला पर्याय तिच्या दृष्टीनं सहज, सोपा होता. पण... पण मला माझं सर्वस्व असलेली वही देणं जिवावर आलं होतं. ती बही माझे पंचप्राण होती. त्या वहीशी माझे असे अनंत क्षण निगडित होते. ती वही होती माझी मार्गदर्शक, शिक्षक अन् प्रेरक. तिची ताटातूट म्हणजे मायलेकराचीच ताटातूट. मी विचित्र कोंडीत सापडले. मला ऊर्मिलाला मदतही करावीशी वाटत होती अन् वही देण्यास माझं मन तयारही होईना. काय करावं ? शेवटी चार दिवसांसाठी वही द्यायचं ठरलं. ““ए, पण नीट वापर. पानं फाटता कामा नयेत. कुठे विसरूबिसरू नकोस, तुझ्या लहान भावंडांपासून जप." त्यावर ती मला म्हणाली होती, “'तुला जर इतकी काळजी वाटत असेल, तर नको देऊस.”' डोळ्यांत पाणी भरत ती म्हणाली, “यावर्षी जर मी नापास झाले, तर कदाचित माझी शाळा बंद होईल.'? अन् मी बही तिला दिली. चार दिवस कधी एकदा संपताहेत असं मला झालं. खरंतर माझा मलाच राग आला.
आपण थोडातरी विश्वास ठेवायला शिकलंच पाहिजे,' पण ही दटावणी ऐकण्यास मन तयार नव्हतं. चार दिवस संपले अत् कधी एकदा शाळेत ऊर्मिला भेटतेय, असं मला झालं होतं. त्या दिवशी मी जरा घाईनंच शाळेत गेले. आर्थनाही झाली, पण ऊर्मिला शाळेतच आली नाही. त्या दिवशी एकाही तासाकडे माझं लक्ष नव्हतं. डोळ्यांसमोर नाचत होती बही फक्त बही. शाळा सुढ्ताच मी तडक ऊर्मिलाचं घर गाठलं. तर घरास भलं मोठ्ठं कुलूप! माझ्या तर पायांतील व्राणच सरलं. शेजारच्या काकूंकडे चौकशी करण्यास त्यांचं दार 'ठोठावलं. लगबगीनं त्यांनी दार उघडलं. चेहऱ्यावर तेच निर्मळ हसू. मला पाहताच त्या म्हणाल्या, “ऊर्मिला हवी असेल ना? अग, ते सर्वजण तिच्या मावसबहिणीच्या लग्नाला अमळनेरला गेलेत. चार-सहा दिवसांनी येतील.” मी भरभर घरी निघाले. रस्ताभर डोळ्यांसमोर येत होत्या, भूमितीच्या आकृत्या, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन अन् त्यांना छेदणारे, त्यांचे तुकडे करणारे लंबक, विभाजक. आठ-दहा दिवसांनी ऊर्मिला आली. मला जरा हायसं वाटलं. मी वही मागितली, तर 'हो, आणते उद्त्या', असं म्हणू लागली अन् तो उद्या उगवेचना ! आता तर परीक्षा चक्क आठ-दहा दिवसांवर आली अन् ती मला म्हणाली, “तुझी वही हरवलीय.' माझा सारा आधारच हरपला. सगळ्या दिशांत भरून राहिला अंधार, फक्त अंधार. मी तिला फक्त बरं म्हटलं. जास्त मी काही करू शकत नव्हते. मी पुन्हा एक वही केली. 'पुनश््च हरी ३ रात्र रात्र जागून आठवून आठवून मी वही तयार केली. त्या जेळी माझा स्वतःचा माझ्या स्मरणशक््तीवर आणि केलेल्या अभ्यासावर पक्का विश्वास बसला. मी अभ्यास नुसती घोकंपट्टी करून केलेला नव्हता. माझ्यापुढे खरंतर ते मोठ्ठं आव्हान होतं. सारं सारं आठवत होतं. काही काही नवीनही सुचलं अन् माझी बही पूर्ण झाली. मनातल्या मनात मी ऊर्मिलाचे आभार मानले. वही हरवली म्हणूनच मी इतका समरसतेने, सखोल अभ्यास केला. परीक्षा झाली. ऊर्मिला खरंतर मला चुकवत राहिली. भूमितीचा पेपर झाला. मला पैकीच्या पैकी गुणांची खात्री होती. पेपर झाल्यावर ऊर्मिला माझ्याजवळ येत म्हणाली, “कसा होता पेपर ?"' मी म्हटलं, “।मस्त !'' “पण तुझी तर वही...” “ही काय, मी पुन्हा केली त्याहीपेक्षा छान ! तुझी मी आभारी आहे. अग, बही हरबली म्हणून तर ...” 'अग, दोन-चार दिवसांपूर्वीच बही सापडली." “ती राहू दे आता तुलाच. ही बघ माझी नती वही. पण आता मी ठरवलंय ...” यान ल “कोणावरही विश्वास ठेवायचा नाही अन् मदत तर नाहीच नाही.'' “छे, छे इंदुमती, माझं चुकलं. खरंतर ... “खरंतर वही हरवलीच नव्हती." “तुला कसं ठाऊक ?" “जाऊ दे. तू पास होशील ना? तोच एक आनंद. तुझी शाळा सुटणार नाही." 'इंदुमती, त्यापेक्षा मी नापास झाले असते तर बरं, रोज तुला मी फसवत आहे, या विचारानं आयती बही वाचूनही मला काही कळत नव्हतं.” “ऊर्मिला, माझी आई नेहमी सांगते, कोणतीही गोष्ट आयती वा फुकट घेऊ नये. श्रमण्यात, ती स्वत: मिळवण्यात, शिकण्यात मोठूठा आनंद असतो.''
('ओंजळ' या पुस्तकातून साभार)
Tags
सहावी