इयत्ता सातवीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात
आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा
पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट
सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला
सराव होण्यास मदत होईल. सातवी APP डाऊनलोड
१ बोधकथा वाचा.
एका माणसाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा माणसाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. माणूस त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव्हा शोभायात्रा शेठजीच्या घरासमोरून चालली तेंव्हा राजाने माणसाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले. शेठजीने हे पाहून विचार केला कि हा माणूस तर राजाचा गुरु आहे. राजा याच्या ऐकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी माणसाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच शेठजीने एक हजार रुपये माणसाच्या घरी पोहोच केले. यामुळे माणसाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला.
इयत्ता सातवी | ||
---|---|---|
अ.क्र | विषयाचे नाव | टेस्ट सोडवा |
1 | सातवी मराठी | सोडवा |
2 | सातवी हिंदी | सोडवा |
3 | सातवी इंग्रजी | सोडवा |
4 | सातवी गणित | सोडवा |
5 | सातवी विज्ञान | सोडवा |
6 | सातवी इतिहास | सोडवा |
7 | सातवी भूगोल | सोडवा |
एका गावात एक वृद्ध महिला राहत होती, तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती, एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना!. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेंव्हा गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला, आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे, मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली व म्हणाला, आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि साखर असती तर ना खूप मज्जा आली असती. महिलेने विचार केला थोडे तांदूळ आणि साखर दिली तर काय बिघडते. तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दुध, वेलची आणि सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने कंजूष महिलेच्या घरी खीर खाल्ली.
तात्पर्य - बुद्धीच्या जोरावर संकटकाळातही आपण आपले काम सध्या करू शकतो.
१ बोधकथा वाचा.
तात्पर्य - जीवनात कधी कधी असेही होते कि आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेंव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते.
Tags
सातवी मराठी