इयत्ता सातवीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात
आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा
पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट
सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला
सराव होण्यास मदत होईल. सातवी APP डाऊनलोड
बोधकथा १ :
इयत्ता सातवी इतिहास | ||
---|---|---|
अ.क्र | पाठाचे नाव | टेस्ट सोडवा |
1 | इतिहासाची साधने | सोडवा |
2 | शिवपूर्वकालीन भारत | सोडवा |
3 | शिवपूर्वकालीन भारत भाग २ | सोडवा |
4 | धार्मिक समन्वय | सोडवा |
6 | शिवपूर्वकालीन महाराष्ट्र | सोडवा |
7 | स्वराज्य स्थापना | सोडवा |
8 | मुघलांशी संघर्ष | सोडवा |
9 | स्वराज्य स्थापना | सोडवा |
एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते कि कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते. त्यांच्या मागे एक भलामोठा वाघ असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत बसतो.तो गुरुना विचारतो आता आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात कि आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे.आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या दसपट जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय उपयोग? आपण केवळ त्याला सामोरे जावू. शिष्य अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते त्याचे पाय थरथरु लागतात. तो चक्कर येवून पडतो. नंतर त्याला जाग येते तेंव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर ध्यानाच्या माध्यमातून आपण तो परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो. वाघाला पाहून तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले तो जवळ पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका नाही हे जाणवून तो दूर निघून गेला.
तात्पर्य- प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर केला गेला पाहिजे.
बोधकथा २ :
एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्यातरी आजाराने ग्रस्त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्हातारी स्वाभिमानी असल्याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्हणायला आणि मृत्युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्यु समोर पाहून म्हातारी घाबरली आणि म्हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्यूदेव निघून गेले आणि म्हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.
तात्पर्य- जीवनापासून पळ काढणे म्हणजे समस्येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत राहणे, आपले नित्यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.
बोधकथा ३
एक राजा होता. तो वेगवेगळे वेश परिधान करून राज्यात फेरफटका मारत असे. त्या निमित्ताने त्याचा जनतेशी होत असे. जनतेचे दुःख, वेदना, गरजा यांची तो माहिती करून घेत असे. एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला कि आपण सर्व देशात फिरून जनतेचे दुःख, गरजा यांची माहिती करून घ्यावी व त्यावर उपाय करावे. त्याच्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आणि पूर्ण देशात फिरून तो परत आला. परत आल्यावर तो महालातून बाहेरच पडेन. शेवटी सगळे मंत्रीगण त्याच्या भेटीला महालात गेले तेंव्हा राजाने त्यांना त्याची कहाणी ऐकवली व मंत्र्यांकडे त्याने त्याचे पाय खूप दुखत असल्याची तक्रार केली. राजाचे असे म्हणणे होते कि रस्त्यात जे दगड धोंडे, गोटे पडले आहेत त्यामुले त्याचे पाय खूप दुखत आहेत. यावर काही उपाय लवकरात लवकर केला पाहिजे. मंत्रीगण विचार करू लागले कि काय उपाय करावा? पण राजाच तत्काळ म्हणाला कि या देशात कुणाला सुद्धा दगडगोटे टोचू नयेत यासाठी सर्व रस्त्यांवर एक चामडे अंथरले जावे व त्याने संपूर्ण रस्ता आच्छादित करावा. राजाचे हे बोलणे ऐकून सगळे मंत्रीगण आता मात्र कोड्यात पडले कि या मूर्खपणाच्या निर्णयावर बोलावे तरी कसे आणि काय? कारण जो उलट बोलेल त्याला राजा शिक्षा करेल. म्हणून कोणीच काही बोलले नाही. शेवटी मध्ये बराच वेळ गेला कोणीच काही बोलेन तेंव्हा एक बुद्धिमान मंत्री उठला व राजाला म्हणाला कि महाराज मी एक उपाय सुचवितो ज्याने चामडे अंथरण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा वाचेल आणि तुम्हालाही दगडगोटे टोचणार नाहीत. राजा म्हणाला सांग कि लवकर! मंत्री म्हणाला,"सगळ्या देशातील रस्त्यांवर चामडे अंथरण्यापेक्षा महाराज तुम्हीच चांगल्या प्रतीचे जोडे का बनवून घेत नाहीत? यातून खर्च हि कमी होईल आणि तुम्हाला पण कष्ट होणार नाहीत." राजा आश्चर्य चकित होवून मंत्र्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने जोडे बनविण्यासाठी कारागिराला बोलावणे धाडले. तात्पर्य- कायम अशा उत्तराबद्दल विचार केला पाहिजे कि ज्यामुळे आपले कमीत कमी नुकसान होइल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कधीकधी चुकूही शकतात. दुसऱ्यांबरोबर चर्चा करूनही कधी कधी उत्तर मिळते. . एक राजा होता. तो वेगवेगळे वेश परिधान करून राज्यात फेरफटका मारत असे. त्या निमित्ताने त्याचा जनतेशी होत असे. जनतेचे दुःख, वेदना, गरजा यांची तो माहिती करून घेत असे. एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला कि आपण सर्व देशात फिरून जनतेचे दुःख, गरजा यांची माहिती करून घ्यावी व त्यावर उपाय करावे. त्याच्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आणि पूर्ण देशात फिरून तो परत आला. परत आल्यावर तो महालातून बाहेरच पडेन. शेवटी सगळे मंत्रीगण त्याच्या भेटीला महालात गेले तेंव्हा राजाने त्यांना त्याची कहाणी ऐकवली व मंत्र्यांकडे त्याने त्याचे पाय खूप दुखत असल्याची तक्रार केली. राजाचे असे म्हणणे होते कि रस्त्यात जे दगड धोंडे, गोटे पडले आहेत त्यामुले त्याचे पाय खूप दुखत आहेत. यावर काही उपाय लवकरात लवकर केला पाहिजे. मंत्रीगण विचार करू लागले कि काय उपाय करावा? पण राजाच तत्काळ म्हणाला कि या देशात कुणाला सुद्धा दगडगोटे टोचू नयेत यासाठी सर्व रस्त्यांवर एक चामडे अंथरले जावे व त्याने संपूर्ण रस्ता आच्छादित करावा. राजाचे हे बोलणे ऐकून सगळे मंत्रीगण आता मात्र कोड्यात पडले कि या मूर्खपणाच्या निर्णयावर बोलावे तरी कसे आणि काय? कारण जो उलट बोलेल त्याला राजा शिक्षा करेल. म्हणून कोणीच काही बोलले नाही. शेवटी मध्ये बराच वेळ गेला कोणीच काही बोलेन तेंव्हा एक बुद्धिमान मंत्री उठला व राजाला म्हणाला कि महाराज मी एक उपाय सुचवितो ज्याने चामडे अंथरण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा वाचेल आणि तुम्हालाही दगडगोटे टोचणार नाहीत. राजा म्हणाला सांग कि लवकर! मंत्री म्हणाला,"सगळ्या देशातील रस्त्यांवर चामडे अंथरण्यापेक्षा महाराज तुम्हीच चांगल्या प्रतीचे जोडे का बनवून घेत नाहीत? यातून खर्च हि कमी होईल आणि तुम्हाला पण कष्ट होणार नाहीत." राजा आश्चर्य चकित होवून मंत्र्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने जोडे बनविण्यासाठी कारागिराला बोलावणे धाडले.
तात्पर्य- कायम अशा उत्तराबद्दल विचार केला पाहिजे कि ज्यामुळे आपले कमीत कमी नुकसान होइल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कधीकधी चुकूही शकतात. दुसऱ्यांबरोबर चर्चा करूनही कधी कधी उत्तर मिळते. .
संग्रहित
Tags
सातवी इतिहास