सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील सुटटयांबाबत सूचना.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माथमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयांबाबत.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुटटयांची निश्चिती करण्यात येते.
१) शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुटटी लागू करण्याबाबत सूचना द्याव्यात. सदर सुटटीचा कालावधी दि. १३ जून २०२१ पर्यंत ग्राहय धरण्यात यावा. व पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात. शासन निर्णय क्र. संप्रप २००६ / (१३७/०६) प्राशि-५ दि. २२ जून २००७ नुसार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुटटीनंतर सोमवार दि. २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील.
२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.
३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
४) सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालीका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सबब सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थती विचारात घेवून शासनस्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील.
शिक्षण संचालक- द .गो.जगताप
Tags
School Related info.