इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

3.5.पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी

     इयत्ता सहावीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल. सहावी APP डाऊनलोड


बोधकथा
  १

         धैर्यधर नावाचे एक व्यापारी होते. व्यापार उत्तम चालत होता. आमदानी उत्तम होती. अर्थातच धैर्यधरांनी प्रामाणिकपणे ही संपत्ती कमावली होती. लोक त्यांना गमतीनं म्हणायचे, ”तुमचं नाव धैर्यधर आहे, पण तुम्ही आहात लक्ष्मीधर.”होय, मी लक्ष्मीधर आहे; पण मूळचा मी धैर्यधरच खरा.” धैर्यधर म्हणाले. बरीच वर्षे व्यापार केला. संसार सुखाचा झाला. आता जरा स्वास्थ्य आलं. धैर्यधरांनी विचार केला. ‘ ‘आता जरा हिंडावं, फिरावं, देश बघावा. तीर्थयात्रा करावी, जीवनाचा आनंद लुटावा. मग आपले सेवक आणि आपला एक पुतण्या यांच्यावर कारभार सोपवून धैर्यधर तीर्थयात्रेला गेले. 
            काशी-रामेश्वर, हिमालयात गेले. दोन महिने ते बाहेर होते. आता परत आलो की, पेढीवर बसायचं या उद्देशाने ते परतीच्या वाटेला लागले. पण परत येऊन बघतात तो काय? पुतण्या आणि सेवक घरात हताशपणे बसले होते. ”काय झालं ?’ धैर्यधरांनी विचारलं. ‘ आपलं दुकान, पेढी सर्व आगीच्या अक्ष्यस्थानी पडलं. काही राहिलं नाही. आम्हीच कसेतरी वाचलो. आग कशी लागली समजलं नाही. ” पुतण्या म्हणाला. धैर्यधरांनाही क्षणभर अस्वस्थ वाटलं. पण ते म्हणाले, ”ठीक आहे. आता पुढे काय करायचं ते ठरवू” बर्‍याच लोकांना वाटलं, ‘आता काय होणार? सगळी राख झाली. आता धैर्यधर पुन्हा व्यवसाय सुरू करणार नाहीत.’ 
            दुसर्‍याच दिवशी त्या जळालेल्या दुकानावर लोकांना एक फलक दिसला. ‘दुकान जळलं. पेढी जळली, सारं काही जळलं; पण धैर्य नाही जळलं! उद्यापासून दुकान पुन्हा सुरू करीत आहोत.’ लोकांना पटलं की, धैर्यधर हे नुसतेच लक्ष्मीधर नसून खरेच धैर्यधर आहेत. 

तात्पर्य : संकटाना धैर्याने तोंड दिलं तर मार्ग सापडतो.


बोधकथा 2

प्रामाणिकपणा 

जयनाथच्या गुरुकुलात अनेक शिष्य विद्याजर्नसाठी वास्तव्याला होते. जयनाथांना एक तरुण अशी उपवर कन्या होती. जयनाथांनी तिचा विवाह करायचे ठरवले. वर संशोधन करीत असता एक दिवस त्यांच्या मनात आले की आपल्याच शिष्यांपैकी एकाला जावई म्हणून करून घ्यावा. सर्व शिष्यांमधला सर्वोत्तम शिष्य कोणता? हे पाहाण्यासाठी त्यांनी सर्व शिष्यांना बोलविले आणि सांगितले की, ‘ ‘तुम्ही कोणाच्याही नजरेस न पडता कोठूनही एखादी मौल्यवान वस्तू चोरून आणून मला दाखवायची. असे जो करेल त्याला मी जावई करून घेईन. सर्व शिष्य गुरुकुलातून बाहेर पडले. ज्याला जेथून जमेल तेधून अनेक मौल्यवान वस्तु चोरून आणून त्यांनी आपल्या गुरुंकडे दिल्या. अपवाद फक्त सोमनाथाचा होता. काहीही न आणता जयनाथांच्या समोर उभा होता. जयनाथांनी त्याला त्याबद्दल विचारता त्याने उत्तर दिले, ‘ ‘गुरुवर्य, मी तुमची आज्ञा पाळू शकलो नाही म्हणून मला क्षमा करा. चोरी करू नये, हे आपणच मला शिकवता आणि चोरी करताना कोणी पाहाणार नाही अशी जागा कोठेही नाही. कारण इतर कोणीही नसले तरी चोरी करतांना मी मला पाहाणारच होतो. ” त्याचे हे उत्तर ऐकून जयनाथ आनंदित झाले आणि म्हणाले, ‘ ‘माझ्या परीक्षेत तू पास झाला आहेस. मी शिकविलेले सर्व संस्कार तू योग्य रीतीने आत्मसात केले आहेस. तुझ्या ह्या प्रामाणिकपणाने मी भारावून गेलो आहे. माझा जावई होण्यास तू एकटाच लायक आहेस.” तात्पर्य : आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल तेच योग्य असे समजून करावे.

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال