इयत्ता सहावीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात
आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा
पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट
सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला
सराव होण्यास मदत होईल. सहावी APP डाऊनलोड
बोधकथा वाचा.
एक प्रसिद्ध संत होते. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून शिष्यगण येत असत. त्यांच्या शिष्य परिवारातील दोन शिष्य त्यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्नान करून पूजापाठ करण्यात मग्न होते. चार तासांच्या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा-या रूग्णांची सेवा करण्यास ते गुरुला मदत करत. त्या संतमहात्म्याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्यामुळे स्वत: पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना नि:शुल्क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्यांच्या उपचारांची व्यवस्था करत असत. एकेदिवशी त्यांचे दोन्ही शिष्य त्यांच्या दीर्घपूजेत व्यग्र होते. त्याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्यादिवशी आश्रमात रुग्णांची संख्या जास्त होती. परंतु दोन्ही शिष्य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा निरोप धाडला. त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्हा गुरुजींनी त्यांना पुढील शब्दात मार्गदर्शन केले,''वत्सांनो, मी तर व्यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते. कारण ती नि:स्वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्या दोन्ही शिष्यांचे डोळे उघडले.तात्पर्य :- ईश्वराची जिवंत कलाकृती म्हणजे माणूस त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा असते व त्या सेवेपेक्षा अन्य कोणतीही पूजा ही मोठी नाही.
Source - वर्तमानपत्र
सहावी इंग्रजी,
Tags
सहावी इंग्रजी