इयत्ता पाचवीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल. पाचवी APP डाऊनलोड
एक बुर्बेन्स नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी एक गाढव पाळले होते. त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते. वावराच्या मधोमध सरळ एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत होते. गाढव दररोज तेच हिरवेगार गवत खात असे.! दोघेही अगदी आनंदाने जगत होते. अर्ध्या भाकरीचे कर्ज - हृद्यस्पर्शी मराठी कथा एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने पूर्ण एक महिन्यासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी विचार केला की. गाढवासाठी खाण्याची व्यवस्था करण्याची काही गरज नाही आहे. कारण जरी नौकाराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील दोन्ही बाजूचा हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो. गृहस्थ गावी गेले.आणि आपले काम पूर्ण करून एक महिन्यानंतर परत आले. बघतात तर. गाढव मृत्यू होऊन पडलेला आहे.! हे असे कसे घडले.? गृहस्थ विचार करायला लागले. रस्त्याकडेला दोन्ही बाजूला भरपूर हिरवागार गवत आहे. आयुष्यभर ही खाल्ले असते तरीही ते संपले नसते. एवढे असूनही गाढव उपासी राहून का मेला असावा.? गृहस्थांना काही कळत नव्हते.! मित्रांनो. नेमके झाले असे होते की. त्या गाढवाचा निश्चयच होत नव्हता की. पहिल्यांदा रस्त्याच्या कोणत्या बाजूचे गवत खायला पाहिजे.? या बाजूचे खायचे.? की त्या बाजूचे खायचे.? पूर्ण महिनाभर असे करता करताच गाढवाने कोणत्याही बाजूचे गवत खाल्लेच नाही आणि त्याचा भुकेने मृत्यू झाला.!
तात्पर्य :- निर्णय करण्याची क्षमता नसली तर मोठे नुकसान ठरलेलेच असते.