इयत्ता दहावीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल.जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट आपणापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.आपल्या प्रतिक्रिया जरुर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. APP डाऊनलोड
कथा वाचा
एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला.
तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना. शेवटी एक
विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली.
तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून
बरे करा. तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन.
वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि त्या
श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला. वैद्याला म्हणाला,
"वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना! अहो, त्रासलेला माणूस
असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का? माझ्या मुलाची स्थिती पाहून मी
त्यावेळी वेडा झालो होतो आणि त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही
असेल. पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते'. त्याने त्या वैद्याला काहीही
दिले नाही.
तात्पर्य : जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात. गरज सरली, की
सोयीस्करपणे बदलतात.
(संग्रहित)
Tags
दहावी भूगोल
9604652860
ReplyDelete��Rushikesh shejawal