इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

तीन अंकी हातचा बेरीज -07

 

Apps डाऊनलोड


बोधकथा वाचा.

 
 
        
         परिश्रमातून सुख एका राजाच्‍या दरबारात हि-यांचे तीन व्‍यापारी येऊन म्‍हणाले,”महाराज आम्‍ही आपल्‍या राज्‍यात मौल्‍यवान हिरे विकण्‍यासाठी घेऊन येत होतो. वाटेत डाकूंनी आम्‍हाला लुटले. आता तुम्‍ही आम्‍हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे.” राजाने त्‍या तिघांना प्रत्‍येकी एक पोते  गहू दिले व राजा म्‍हणाला,” हा गहू तुम्‍ही स्‍वत:च निवडून व दळून त्‍याचे पीठ करावे. त्‍या  पीठापासून अन्न तयार करून तुम्‍ही स्‍वत: खावे किंवा गरजूला खाऊ  घालावे. एक महिन्‍यानंतर मला येऊन भेटावे.” तिघांपैकी दोघे हे जरा आळशीच होते. त्‍यांनी पोत्‍यातील थोडे गहू काढून घेतले. बाकीचे गहू त्‍यांनी विकून टाकण्‍यासाठी गिरणीवाल्‍याला दिले. तिसरा व्‍यापारी मात्र मेहनती होता. त्‍याने गव्‍हाचे पोते निवडण्‍यासाठी रिकामे केले असता पोत्‍याच्‍या शेवटी  त्‍याला एक मौल्‍यवान हिरा सापडला. त्‍याने तो हिरा पैलू पाडण्‍यास दिला. एक महिन्‍यानंतर तिघेही राजाकडे गेले तेव्‍हा तिस-या व्‍यापा-याने पैलू पाडलेला  हिरा राजाला भेट म्‍हणून दिला. तेव्‍हा राजा म्‍हणाला की मित्रा, हा हिरा तुझा आहे. याला विकून जितके काही धन मिळेल त्‍यातून तुझा व्‍यापार तू सुरु कर आणि इतर दोघांच्‍याही पोत्‍यामध्‍ये असाच हिरा होता पण त्‍यांच्‍या आळशीपणामुळे त्‍यांनी तो गमावून बसले.” दोन आळशी व्‍यापा-यांना स्‍वत:ची चूक कळून चुकली पण वेळ निघून गेलेली होती.

तात्पर्य -कठोर परिश्रम करणारेच यशस्‍वी होतात. यशस्‍वी लोकांनाच सुख लाभते.

(वर्तमानपत्रातून संग्रहित)

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال