स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट, हा दिवस भारतातील प्रत्येकासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे. कारण या दिवशी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो होतो.15 august 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला होता. आणि आपण आपल्या देशाचा कारभार आपल्या हाती घेऊन या भारत देशामध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण केली होती. स्वतंत्र मिळविण्यासाठी आपल्या देशातील अनेक महान लोकांनी बलिदान दिले होते. अनेक जणांनी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली होती. विर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी स्वताच्या प्राणाची आहुती दिली. तर गांधीजी सारख्या महान लोकांनी सत्याग्रह तसेच अनेक चळवळी करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे. या दिवशी सर्वजण ध्वजारोहण करतात. भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जातात आणि तिथून तिरंगा झेंडा रोवून हा दिवस साजरा करतात.आओ झुककर सलाम करें उन्हें, जिनकी जिंदगी में मुकाम आया है, किस कदर खुशनसीब है वो लोग, जिनका लहू भारत के काम आया है !!
Great way to celebrate 75th Independence Day of India.
ReplyDeleteखूप छान प्रश्न
ReplyDeleteखूप छान प्रश्न
Deleteछान 👌
ReplyDeleteछान उपक्रम
ReplyDelete