प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन
अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण
होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या
शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या
जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१
मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते,
भाषण व निबंध लिंक्स
कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका (निबंध, भाषण)
कोरोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट आहे. मानवी जीवनाच्या स.र्वच बाजूंवर या संकटाने प्रभाव टाकला आहे. या रोगाला अजून प्रतिजैविके न सापडल्यामुळे रोग होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे एवढाच आता सर्वांसमोर पर्याय आहे. म्हणून लॉकडाउनचे धोरण अवलंबून हा रोग आटोक्यात आणण्याचा सर्व देशांत प्रयत्न चालू आहे. या परिस्थितीतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे.
करोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी शिक्षणसंस्थासुद्धा बंद केल्या आहेत. भारतातील ही सर्व शिक्षण संस्था बंद आहेत.गेली १५ महिने महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा बंद असल्या, तरी देशातील पंधरा राज्यांत आणि अनेक देशांमध्ये 'लॉकडाउन'चे दिवस वगळता शाळा कमी-अधिक प्रमाणात चालू आहेत. कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे शिक्षकांची भूमिका पूर्णतः बदलेल्या गेली आहे. पारंपारिक शिक्षण पद्धती व शिक्षकांची शिकवण्याची पद्धती ही बदललेली असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवनावर व शिक्षणावर त्याचा सर्वांगीण प्रभाव पडतो आहे.
कोविड काळातही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे थांबविले नाही. ऑनलाइन माध्यमांद्वारे शिक्षकांनी शिक्षण देणे सुरू ठेवले होते. महामारी जागतिक संकट या सर्वांमध्ये मुलांना मानसिक शैक्षणिक सामाजिक आधार देण्याचे कार्य शिक्षकांनी केले त्यामुळे शिक्षकांची भूमिका ही अमूल्य आहे. कितीही मोठे संकट आले तरी त्याला घाबरून न जाता आपले कार्य आपले शिक्षण आपली कर्तव्य बजावणे ही आपली जबाबदारी आहे हेच शिक्षकांच्या या कार्यातून दिसून येते. कोरोना काळामध्ये शिक्षक ऑनलाइन मुलांचा अभ्यास घेत होते. त्यांच्या सराव परीक्षा त्यांच्या चाचणी परीक्षा सर्व ही शिक्षकांनी ऑनलाईन घेतल्या. जास्त कठोर निर्बंध व नियम मुलांवर न लावता त्यांच्या कलेने त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला. मुले शाळेत जात नसल्यामुळे त्यांचे जीवन पूर्णतः बदलले होते . तरीही त्यातून मुलांना सावरून त्यांचे शिक्षणाव्यतिरिक्त मनोरंजन कसे होईल त्यांचे मन अभ्यासात कसे लागेल याचाही शिक्षकांनी विचार केला होता. लहान मुलं विद्यार्थी ही देशाचे भवितव्य असतात. त्यांना अशा वेळेस धीर देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षकांनी केले. महामारी चा शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही याची खात्री व जबाबदारी शिक्षकांनी घेतली. यासाठीच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांना कोरोणा योद्धा असण्याचा किताबही दिला होता. यावरूनच कळून येते कि महामारी च्या काळात शिक्षकांची भूमिका किती अमूल्य व दोन चार शब्दात सांगता न येण्यासारखी आहे. महामारी सा कठीण काळातही शिक्षकांनी मुलांचे भवितव्य कसे घडवता येईल याचा विचार केला.
शिक्षकांनी त्यांचे कार्य त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पूर्ण करून मुलांचे अडथळे मुलांना भवितव्यात कोणतेही शिक्षणाची कमी भासणार नाही याची खात्री घेतली. त्यामुळे या काळात शिक्षकांनी साथ विद्यार्थ्यांना दिली ती विसरून चालणार नाही शिक्षकांची भूमिका ही अमूल्य होती व अमूल्य राहील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी अशा काळातही आपल्याला शिक्षण देण्याची व शिक्षण घेण्याची का सोडून दिली नाही. अशाप्रकारे शिक्षकांना धन्यवाद करून मुलांनीही शिक्षणाची साथ कधी सोडू नये व शिक्षकांचा नेहमी आदर करावा. महामारी मध्ये शिक्षकांनी आपले कार्य बजावले ह्याची नोंद विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांना योग्य तो प्रतिसाद देऊन आपले भविष्य घडवण्यात शिक्षकांना सहकार्य करावे ही आपली जबाबदारी आहे.
Tags
Teachers Day