प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन
अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण
होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या
शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या
जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१
मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते,
देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान
भाषण व निबंध लिंक्स
देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान
Deshachya Jadanghadanimadhe Shikshakanche Yogdan
आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका (निबंध)
आपल्या देशाला गुरुशिष्यांची महान परंपरा आहे. संपूर्ण जगाला ज्ञान व संस्कृतीचे शिक्षण देणारी शिक्षण पद्धती ही भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे. गुरुकुला मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान देतात आजही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय शिक्षण परंपरेत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम समजले जाते. आणि देशाच्या जडणघडणीच्या या प्रक्रियेमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे
एकेकाळी भारताची ओळख ही विश्वगुरू अशी होती भारताने जगाला अनेक बुद्धीमंत दिले आहेत.वर्तमानात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षक पार पाडत आहे शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून शिक्षक हा दिशा दाखविणारा सुविधा पुरवणारा सुविधा निर्माण करून देणारा सुविधा दाता आहे. भारताचे माजी मुख्यमंत्री लालबहादूर शास्त्री म्हणतात शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे. भारताचे पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले की भारताला महासत्ता बनवायचे असेल तर शिक्षक प्रेरक माध्यम ठरू शकतात. वर्गाच्या चार भिंती मध्ये शिकणारी पिढी ही देशाचे भवितव्य ठरवू शकेल देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुलांच्या जडणघडणीत व त्यांच्या आयुष्यात शिक्षकांचा एक मोठा वाटा आहे शिक्षक विद्यार्थ्यांना काढताना त्यांची ज्ञानलालसा पुरी करतात. त्यांच्या बहुतेक शारीरिक व मानसिक विकासामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असतो शिक्षक मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं याचे ज्ञान देत असतात. मुलांमधील गुप्त कलागुणांना बाहेर काढतात त्या गुणांना खतपाणी घालून वाढवतात. विकसित करतात जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. सामाजिक मानसिकता बदलण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. नैतिकता आणि मूल्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. चांगले शिक्षक ही देशासाठी सक्षम पिढी तयार करतात.
विद्यार्थ्यांना संवेदनशीलता आणि प्रतिष्ठा यांच्या आघाडीवर घेऊन जाण्याचे काम शिक्षकांना करावे लागते.
एकूणच शिक्षक हा देशाचा कणा आहेत हे लालबहादूर शास्त्रींचे वाक्य सार्थ ठरते. वर्गात असलेले विद्यार्थी व देशाची प्रगती यांची निश्चिती करते म्हणूनच देशाच्या उज्ज्वल जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे .
Tags
Teachers Day