महात्मा गांधी
महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय काण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली.तेथूनच त्यांचा स्वातंत्र्यासाठी तसेच मानवी हक्कांसाठी लढा सुरु झाला.महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आपण प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत.
प्रश्नमंजुषा कोणासाठी?
यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात.
प्रमाणपत्र मिळेल का?
हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल.सहभागी सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल. 8 ऑक्टोबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.
प्रश्नमंजुषा कालावधी
३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१
Tags
Quiz
All questions are best
ReplyDeleteमार्क दिसत नाही
ReplyDelete