प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन
अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण
होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या
शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या
जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१
मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते,
मी इयत्ता आठवी मध्ये शिकत असताना आमचे वर्गशिक्षक शिंपी सर होते. शिंपी सर मराठी विषय शिकवत असे . ते सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा विचारात असायचे मुलांनाही काहीतरी नावीन्यपूर्ण करण्यासाठी प्रेरित करायचे. एके दिवशी नेहमीप्रमाणे सर सकाळी वर्गात आली त्यांनी मुलांची हजेरी घेतली परंतु त्यांच्या डोक्यात कसलातरी विचार चालु आहे माझं पटकन लक्षात आले. पारंपारिक पद्धतीने शिकवण्या सोबत एक नवीन उपक्रम राबवण्याचे त्यांचा मनात विचार चालू होता. एके दिवशी ते आम्हाला उपक्रमाबद्दल सांगू लागले तेव्हा ते म्हणत होते की मी शिकवत असताना काही विद्यार्थी त्या गोष्टी लवकर आकलन करतात म्हणजे चटकन शिकून जातात तर काही विद्यार्थ्यांना एकदा दोनदा तीनदा अधिकदा समजावून सांगावे लागते व काही मोजक्या दोन तीन विद्यार्थ्यांना भरपूर वेळा समजावूनही लवकर लक्षात येत नाही. याची कारणे अनेक असू शकतात एक तर अध्यापनात त्यांना रस नसावा किंवा शिक्षकांबद्दल असलेल्या भीती पोटी त्यांना लवकर लक्षात येत नाही. काही मुल धाडसी असतात प्रश्न विचारतात मला हे समजले नाही असे विचारून समजून घेतात परंतु शिक्षकाबद्दल भीती असलेली मुलं हे विचारण्यात मागे राहतात व नेहमीच मागे मागे पडत जातात.
भाषण व निबंध लिंक्स
माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम (निबंध, भाषण)

तर या मुलांना पुढे आणण्यासाठी सरांच्या मनात उपक्रम राबवण्याचे चालू होते.
एकेदिवशी सरांनी त्या मुलांना जवळ बोलावले व त्यांना विचारले की वर्गामध्ये तुम्हाला कोणाकडून शिकायला जास्त आवडेल. विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला मी शिकवणार नाही मी सोडून विद्यार्थी त्यांना शिकवतील हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. आपल्याला आपले मित्र-मैत्रिणी शिकवणार आहेत हे ऐकून त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या हुशार मुलांची नावे घेण्यास सुरुवात केली. सरांनी त्या विद्यार्थ्यांना उभे करून त्यांना या मुलांना शिकवण्याची जबाबदारी दिली ते विद्यार्थीसुद्धा आनंदाने तयार झाले कारण आजपासून ते त्यांचे शिक्षक होते आणि शिक्षक या भूमिकेत शिरून ते त्या विद्यार्थ्यांना प्रगत करणार होते.
आठ दिवसांचा उपक्रम दिल्यानंतर ती मुले त्या विद्यार्थ्यांना जीव ओतून शिकवू लागली.
जी मुले मागे होती ती आपल्या समवयस्क मित्रांकडून आपल्याला शिकायला मिळत आहे हे बघून शिकण्यात रस घेत होती. आठ दिवस उपक्रमांचा वर्ग चालू होता. हुशार विद्यार्थी व मागे राहणारे विद्यार्थी दोन्ही या उपक्रमात सहभागी होते व रसही दाखवत होते. आश्चर्य म्हणजे सरांना चे काम पंधरा वीस दिवसात रागवून समजावून जमलं नाही ते या मुलांनी आठ दिवसात करून दाखवलं होतं. चांगला अनुभव आल्यानंतर सरांनी हा उपक्रम दर महिन्याला राबवायचे ठरवले होते. यामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होता व मागे पडणारी मुले ही चटकन शिकत होती. शिकवणारे विद्यार्थीही नवनवीन गोष्टी शिक्षकांनी शिकवायचा आधीच शिकवून येत होती व कधी एकदा सरांना सांगतो असं त्यांना व्हायचं .
प्रत्येक विद्यार्थ्याला तीन मुलांना शिकवण्याची जबाबदारी दिली होती अशाप्रकारे हा उपक्रम सरांनी आमच्या वर्गात राबवला या उपक्रमाची दखल सर्वांनी घेतली सर्व शिक्षकांनी घेतली व त्यांनी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. जेव्हा मुख्याध्यापकांनी या उपक्रमाची दखल घेतली तेव्हा त्या अत्यंत आनंदी झाला त्यांनाही हा उपक्रम अत्यंत आवडला होता त्या मधून मुलांची प्रगती होत आहे.अशाप्रकारे शिंपी सरांचा या उपक्रमासाठी माननीय मुख्याध्यापकांनी शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व शिक्षकांचा समवेत शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला अशाप्रकारे माझ्या शिक्षकांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला होता याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर दूरगामी झाला होता. बर्याचश्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली होती तर जे मुलं शिकवत होती त्यांना शिक्षक बनवण्यात ही रस निर्माण झाला अशा प्रकारे मुलांचा सर्वांगीण आयुष्यावर त्या उपक्रमाचा परिणाम झाला होता.
Tags
Teachers Day