प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन
अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण
होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या
शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या
जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१
मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते,
भाषण व निबंध लिंक्स
मी शिक्षक, शिक्षिका झाले तर (भाषण, निबंध)
काही दिवसांनी शाळेत शिक्षकदिन साजरा होणार होता म्हणजे सगळ्या शाळेत आनंदी आनंद. शिक्षकदिन साजरा करण्यासाठी एक दिवस शाळेचा संपूर्ण कारभार सगळे विद्यार्थी मिळून सांभाळणार होते.माझ्याही मनात विचार आला, मी सुद्धा शिक्षक झालो तर? कारण एका दिवसासाठी शिक्षक होण्यापेक्षा मला कायमस्वरूपी शिक्षक व्हायला जास्त आवडेल. शिक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायला आवडेल. लहानपणी शाळेत जेव्हा पाहिलं पाऊल टाकलं तेव्हा इतर रडणाऱ्या मुलांकडे बघून मला आश्चर्य वाटायचं. शाळेत येताना कशाला रडायचं? मला तर खूप गम्मत वाटायची.
मुलांनी भरलेला तो वर्ग, समोर असलेला फळा, फळ्यासमोर असलेले टेबल, त्यावरचा पांढऱ्या आणि रंगीबेरंगी खडूचा डबा. सर्वच काही गमतीशीर. वर्गात शिक्षक आल्यावर होणारी शांतता, त्यांना मिळणारा तो आदर, त्यांच्या ओरडण्यातला तो धाक, गावात आणि सभोवताली शिक्षकांना मिळणारा मान हे सर्वच मला प्रचंड आवडायचं. मनोमन मी तेव्हाच ठरवून टाकलेलं कि मी शिक्षक होणार.
मी शिक्षक झालो तर सर्वप्रथम मी वर्गातल्या मुलांसोबत मैत्री करेन. त्यांच्यासोबत असताना मी अगदी त्यांच्यासारखा होऊन वागेन. शिकवत असताना मुलांना समजेल उमजेल याच भाषेत शिकवेल. मी अगोदर हे जाणून घेईल कि मी जे शिकवत आहे ते मुलांना समजत आहे का ? नसेल समजत तर मी या गोष्टींचा अभ्यास करेन कि विद्यार्थ्यांना समजण्यासाठी काय करू? माझ्या शिकवणीत काही कमतरता आहे का? जी कमी असेल ती भरून काढण्याचा प्रयत्न करेल.
मी मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यासच देणार नाही तर कधी तरी त्यांना निसर्ग शिकवेल, प्राणी पक्षी यांची माहिती सांगेन, त्यांना कधी तरी कुठेतरी मोकळ्या हवेत घेऊन जाईन, आणि तिकडेच एक दिवसाचा वर्ग घेईन. त्या मोकळ्या हवेत त्यांना माणूस म्हणून कस जगायचे हे पुस्तकाबाहेरच शिकवीन. मुलांना घेऊन कधी तरी, कुठे तरी सहलीसाठी जाईन ज्या मध्ये मीही त्या मुलांमधलाच एक होईन. त्यांच्या बरोबर नाचेन,खेळेन, गाणी म्हणेन,आणि हे सगळ करत असताना त्यांना जगण्यातला आनंद शिकवेन.
असे म्हणतात की शाळेचा वर्ग हि मुलांच्या सुखकर भविष्याची पहिली पायरी असते. पालक आपल्या मुलांना त्यांचे भविष्य चांगले व्हावे म्हणून शाळेत पाठवतात. परंतु आज शिक्षण म्हणजे स्पर्धा झाली आहे. टक्केवारी मिळवण्याची स्पर्धा. लहान लहान मुलांना सुद्धा या स्पर्धेने घेरून टाकलंय. शिक्षकही आपल्या शाळेचे नाव बोर्डात यावे म्हणून विद्यार्थ्यांकडून प्रचंड अभ्यास करून घेतात. अर्थात ते वाईट नाहीये. परंतु मुलांचे बालपण यात कुठेतरी नाहीसे होत चालले आहे.
आधी पालकांच्या आणि नंतर शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने खचलेल्या मुलांना मी मनमोकळेपनाने (स्वच्छंदी) जगण्याचा आधार देईल. माझ्या वर्गात परीक्षा असेल पण ती फक्त पुस्तकावर नसेल ती असेल अनुभवावर आणि ज्ञानावर.त्या परीक्षेत कोण पहिला , कोण दुसरा, कोण शेवट असे नंबर येणार नाहीतच पण कोण पास पण होणार नाही आणि कोण नापास पण नाही.
एक तर यशस्वी होतील नाहीतर अनुभवी होतील. आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटरूपी परीक्षेला कसे सामोरे जावे हे यातून त्यांना शिकायला मिळेल. कारण शाळेच्या परीक्षेत यशस्वी होणारे अनेक विद्यार्थ्यी जीवनाच्या परीक्षेत अपयशी होतात कारण त्यांना शालेय जीवनातील परिपूर्ण शिक्षण कमी पडलेले असते, अथवा समजलेच नसते. मी माझे विद्यार्थी असे परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करीन कि जगाच्या पाठीवर ते कुठेही गेले तरी शाळेतून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर ते मोठी मोठी शिखरे सहज पार करतील. मी त्यांचे शुद्ध लेखन सुधारण्याबरोबरच आचार आणि विचारक्षमता सुधारीन आणि शिक्षित विद्यार्थी घडवण्याबरोबरच कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करीन.आयुष्यात नेमके काय करायचे हा प्रश्न आपण नेहमीच स्वत:ला विचारतो पण आयुष्यात नेमके कुठे जायचे आहे हेच कळत नाही, तर आयुष्यात नेमके काय करायचे? कुठे जायचे? हि दिशा दाखवण्याचे काम तर शिक्षकच करत असतात आणि हेच बहुमोलाच काम मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी करायचे आहे. एक शिक्षक म्हणून नाही तर मला माझ्या पुस्तकांनी ,चुकांनी, मैत्रीने आणि अनुभवाने जे काही शिकवले ते मी मुलांना शिकवेन. मी माझ्या विद्यार्थ्यंचे ध्येय हरवण्यासाठी नाही तर ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अशा प्रकारे जर मी शिक्षिक झालो तर डिजिटल आणि हायटेकच्या जमान्यात फक्त विद्यार्थी बनवणारा शिक्षक न होता माणूस विद्यार्थ्याला चांगला माणूस बनवणारा शिक्षक होईन. कारण मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदूरुपी शिक्षक होऊन चातकाची तहान भागवण्यात जास्त श्रेष्ठता आहे असे मला वाटते.
Tags
Teachers Day