इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध /भाषण l Shikshak Samaj Parivartanche Madhyam (Nibandh/Bhashan)

        प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्‍ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्‍त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, 
भाषण व निबंध लिंक्स










शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध /भाषण 
 Shikshak Samaj Parivartanche Madhyam (Nibandh/Bhashan)


आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका (निबंध)

                शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते.आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल घडला पाहिजे, याविषयी सर्वांचेच एकमत आहे. हे परिवर्तन घडत असताना भारताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान-परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता आहे. केवळ एकांगी विज्ञान-शिक्षण देऊन शिक्षणाचे काम संपत नाही व तशा प्रकारच्या शिक्षणामुळे राष्ट्राचे पुनर्निर्माणही होत नाही हे गेल्या काही वर्षांतील शैक्षणिक इतिहासातून आपण शिकलो आहोत. शिक्षणाला अध्यात्माची साथसंगत हवी हे अधोरेखित झाले आहे. केवळ विज्ञान शिक्षणामुळे ‘वैज्ञानिक-अंधश्रद्धा’ वाढते. त्यामुळे माणूस भौतिक सुखाच्या व चैनीच्या मागे लागतो. तो सुखलोलुप बनतो. तो आपल्या गावापासून दूर शहरात किंवा अन्य देशांत स्थलांतरित होतो. त्याला आपल्याच देशातील पूर्वापार परंपरा, चालीरिती यांविषयी घृणा वाटू लागते. म्हणून विद्यार्थ्याला त्याच्या परिसराशी जोडणार्‍या, जोडून ठेवणार्‍या, सामाजिक बांधीलकीचे भाव जपणार्‍या शिक्षणाची गरज आहे. 

                      मनुष्याच्या शरीर, मन व बुद्धीचा विकास करणारी व आत्मविश्‍वास निर्माण करणारी शिक्षण-प्रणाली विकसित करण्याची गरज अनेक विद्वानांनी व्यक्त केली आहे. शिक्षण असे हवे ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीच्या संस्कारांबरोबरच श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्‍वास व आत्मगौरव निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या वैभवशाली व कर्तृत्ववान इतिहासाची माहिती पाठ्यपुस्तकांद्वारे देणे गरजेचे आहे. या दृष्टीने शिक्षणाचे भारतियीकरण झाले पाहिजे. शैक्षणिक नीती व तंत्रज्ञानात भारतीय ज्ञान-विज्ञान यांची उपलब्धता व प्रोत्साहन हवे. म्हणून भारतीय सांस्कृतिक वारशाचे अध्ययन पाठ्य चर्चेमध्ये समाविष्ट व्हावे. भारतीय समाजाच्या विकासाची व उन्नयनाची आस धरणार्‍या शिक्षणाने भारतीय भाषांची कदर केली पाहिजे. 

                        इंग्रजी बरोबरीनेच स्थानिक भाषांचे परिपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. समाज जीवन व व्यक्तीजीवन यांद्वारे वाढणार्‍या नकारात्मक प्रवृत्तींना फोफावू न देता त्याऐवजी सामाजिक दायित्व व सामाजिक चेतना शिक्षणामुळे वाढीस लागली पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचे संस्कार, साक्षरता, भावनांची अभिव्यक्ती व परिसर – निरीक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. तर माध्यमिक शिक्षणाद्वारे जीवनाला उपयोगी पडणार्‍या विषयांचे शिक्षण, विचारांना चालना मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची जशी ही अवस्था आहे, त्याप्रमाणे मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव करून देण्याचेही हेच योग्य वय आहे. त्यापुढील उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे. 

                        विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे व सामाजिक समस्यांसंबंधी स्वतःचे चिंतन निर्माण करण्यास, या शिक्षणाने विद्यार्थ्यांस सक्षम बनवावे. तर त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाद्वारे संशोधन व नवनिर्मिती यांवर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित व्हावे. अशा प्रकारे योग, उद्योग, प्रयोग व सहयोग अशा चार सूत्रांमधून शिक्षणाची चढती कमान योजली पाहिजे. कोणत्याही स्तरावरून विद्यार्थी समाजात गेला तरीही तो समाजहिताची भावना घेऊनच जाईल अशी व्यवस्था या पद्धतीत अनुस्यूत आहे. शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतः आपल्यापासून, कुटुंबापासून, गावापासून, समाजापासून व देशापासून तुटतो, विलग होतो, अशी भावना निर्माण झाली आहे. ती भावना वरील प्रयोगामुळे बदलून समाजही शालेय उपक्रमांना साथ देण्यासाठी निश्‍चितच पुढे येईल. या युगाला ज्ञानयुग म्हणून ओळखतात.

                             किमान दहा हजार वर्षांची वैभवशाली ज्ञानपरंपरा असलेल्या भारताने आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या बरोबरीनेच आपली बौद्धिक क्षमताही जगाला दाखवून दिलेली आहे. म्हणून ज्ञान-विज्ञानावर आधारित एका नव्या विश्‍वकल्याणकारी संस्कृतीची देणगी जगाला देण्याची तयारी भारताने दाखविली पाहिजे. त्यासाठी आपल्या शिक्षणाची पुनर्रचना करून हे आव्हान स्वीकारण्यास आपण सज्ज झाले पाहिजे शिक्षक मेणबत्ती सारखा ज्ञानाचा प्रकाश आहे. जो लोकांना अंधश्रद्धेचा अंधारातून बाहेर काढून प्रगतीच्या उजेडाकडे घेऊन जातो. विद्यार्थी व शिक्षकांच्या हातातील ओल्या मातीसारखा असतो ज्याला ते कोणताही हवा तसा आकार देऊ शकतात खरोखरच शिक्षकांमुळे विद्यार्थी घडू शकतात. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे..

खालील सर्व विषय वरील निबंधातून आपणाला मिळतील. याचा नमुना म्हणून आपण वापर करू शकता व आपले सादरीकरण करू शकता.
शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम मराठी निबंध 
शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम भाषण 
शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन 
शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम या विषयावर निबंध 
शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम काव्यवाचन 
शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम काव्यलेखन 
शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम कविता 
शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال