इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

Unit 4.3 The red headed league part 1

    इयत्ता सातवीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल. सातवी APP डाऊनलोड

बोधकथा वाचा.

एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला.

 तात्पर्य : लोचटपणा करुन डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.


 Source - वर्तमानपत्र

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال