शाळा सुरू होण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना
महाराष्ट्रात कोविड- १९ आजाराची दुसरी लाट मावळताना दिसत असून या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक आर्थिक संस्था, आस्थापना आपले कामकाज सुरु करत असून राज्यातील - शाळांमधील वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या पार्श्वभूमीवर सदर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
व्याप्ती:
राज्यातील प्राथमिक शाळा सुरु होत असतांना नेहमीच्या सर्वसाधारण सूचनांसोबतच विशेष प्रसंगी दयावयाच्या सूचनांचा समावेश ही या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला आहे. सदर सूचना राज्यातील सर्व जिल्हे, महानगरपालिका, नगरपालिका, छावणीबोर्ड, इत्यादीमध्ये लागू असतील.
सर्वसाधारण प्रतिबंधात्मक सूचना:
शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने ( शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक इ) कोविड- १९ प्रसार टाळण्यासाठी खालील नमूद केलेल्या सर्वसाधारण प्रतिबंधात्मक सूचना पाळणे आवश्यक आहे.
सूचना खालीलप्रमाणे:
( १ ) दोन व्यक्तींमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवणे.
(२) प्रत्येकाने फेस मास्क / फेस कव्हर वापरणे बंधनकारक आहे.
(३) वारंवार हात धुणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी व इतर संबंधितांच्या "हात कसा धूवावा" याबाबत प्रशिक्षण घेण्यात यावेत..
(४) शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण करून घेण्यात यावे.
(५) खाली नमूद केल्या प्रमाणे श्वसन संस्थेचे शिष्टाचार पाळण्यात यावे.
(अ) शिंकतांना, खोकतांना स्वतःचे तोंड व नाक हात रुमाल टिश्यू पेपर अथवादुमडलेल्या हाताच्या कोपराने झाकावे.
(ब) वापरलेल्या टिश्यू पेपरचे विल्हेवाट आरोग्यदायी रितीने लावण्यात यावी.
(६) प्रत्येकाने आपल्या आरोग्याचे स्वतः बारकाईने निरीक्षण करावे आणि कोणतीही लक्षणे / आजार असल्यास वेळेत सांगावे.
शाळा उघडण्यापूर्वी करावयाचे नियोजन
(१) ज्या शाळा अजूनही कन्टेन्मेंट झोनमध्ये आहे त्या उघडू नये. तसेच जे विदयार्थी, शिक्षक कन्टेन्मेंट झोन क्षेत्रात राहतात त्यांना शाळेत येण्याची अनुमती देऊ नये. विदयार्थी, शिक्षक, पालक यांनी कन्टेन्मेंट झोन क्षेत्रास भेट देऊ नये. अशा सूचना देण्यात याव्यात.
(२) पूर्ण शाळेची संपूर्ण स्वच्छता करून घेण्यात यावी. ज्या पृष्ठ भागांना वारंवार स्पर्श होतोअसे पृष्ठ भाग १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने पुसून घ्यावेत.
(३) ज्या शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या आहेत त्यांची स्वच्छता विशेष लक्ष पूर्वक करण्यात यावी. या विषयी सविस्तर सूचना www.mohfw.gov.in यासंकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
(४) कोविड १९ प्रसार टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रीक उपस्थिती पध्दत टाळण्यात यावी.
(५) शाळेतील विदयार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षात घेऊन ठिकाणीमुबलक धुण्याची व्यवस्था करण्यात यावी.
(६) मैदानावर, प्रार्थनास्थळी मुलांनी रांगेत व्यवस्थित रहावे यासाठी शारिरिक अंतराचा विषय लक्षात घेऊन खुणा करण्यात याव्यात. हिच पध्दत स्टाफ रुम, ग्रंथालये इ. ठिकाणी देखील वापरण्यात यावी.
(७) शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामुहिक प्रार्थना टाळावेत.
(८) शाळेतील जिमनॅशिय वापरताना देखिल कोविड- १९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.
(९) जलतरण तलाव वापरू नयेत.
(१०) ज्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांना अतिजोखमीचे आजार आहेत किंवा ज्या महिला कर्मचारी / शिक्षक गरोदर आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
(११) फेसमास्क / फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायझर, १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा.
शाळा सुरु झाल्यावर घ्यावयाची काळजी
(१) ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींनी (शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक इ. ) शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्याची अनुमती दयावी.
(२) शाळेमध्ये दर्शनी भागात कोविड- १९ प्रतिबंध संदर्भातील आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे.
(३) मुले ज्या स्कुल बस / वाहनाने शाळेला येतात त्या वाहनांमध्ये मुलांची गर्दी असू नये.आवश्यकतेनुसार अशी वाहने १ टक्के सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावीत.
आरोग्य शिक्षण व खबरदारी
(१) शाळेला येताना किंवा शाळा सुटल्यानंतर अथवा मोकळया वेळेत मुलांनी एकत्र येऊन कोविड नियमांचा भंग करु नये, यासाठी मुलांना सावध करा.
(२) मुले किंवा शिक्षक आजारी असतील तर त्यांनी शाळेत येऊ नये आवश्यक नियमांचेपालन करावे.
मानसिक आरोग्याची काळजी
(१) कोविड १९ मुळे मुलांच्या आणि शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन नैराश्य, ताण निर्माण होऊ शकतो. याकरिता शाळेने आवश्यकतेनुसार मानसिक समुपदेशन व्यवस्था करावी.
(२) परस्परांचे भावनिक आरोग्य जपण्यासाठी शिक्षक, पालक, विदयार्थी यांनी एकोप्याने काम करावे.
विदयार्थी, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचा-यांमध्ये कोव्हीड- १९ सदृश्य लक्षणे निर्माण झाल्यास
(१) शाळेतील कोणाला कोविड १९ सदृश्य लक्षणे दिसु लागल्यास घाबरुन जाण्याचे किंवा अशा व्यक्तीला भेदभावाने वागविण्याचे कारण नाही.
(२) पालक आणि वैदयकिय सुविधा केंद्रास कल्पना दयावी आणि वैदयकीय सुविधा उपलब्ध होई पर्यन्त किंवा पालक येई पर्यन्त अशा विदयार्थ्याला खोलीत ठेवावे.
बाधित विदयार्थी वर्गामध्ये आढळल्यास पुढील प्रमाणे कृतीयोजना करणे आवश्यक आहे.
(१) तो विदयार्थी वर्गामध्ये ज्या रांगेत बसतो त्याच्या मागील पुढील आणि दोन्ही बाजूच्या ३ रांगेतील विदयार्थ्यांना निकट सहवासित मानावे.
(२) या शिवाय इतर कारणांमुळे बाधित विदयार्थ्याच्या निकट संपर्कात आलेल्या विदयार्थ्यांची/ शिक्षकांची यादी करावी.
(३) अशा निकट सहवासित विदयार्थ्यांना दोन आठवडयांकरिता होम क्वारंटाईन करावे. या काळात ज्यांना कोविड सारखी लक्षणे आढळल्यास त्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी. ज्यांच्यामध्ये कोविड लक्षणे दिसून येत नाही अशा विदयार्थ्यांनी ५ -१० दिवसांमध्ये कोविड चाचणी करुन घ्यावी.
(४) बाधित व्यक्तींना त्यांच्या लक्षणाप्रमाणे वैदयकीय सल्यानुसार घरगुती / रुग्णालयीन विलगीकरणात उपचार करणे आवश्यक आहे.
(५) अतिजोखमीचे आजार असणाऱ्या विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी.
(६) ज्या वर्गात विदर्यार्थी कोविड बाधित आढळून आले त्या वर्गातील बाके, १% सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच स्वच्छतागृहे, सामायिक जागा यांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे.
(७) वर्गातील व इतर कमी जोखमीच्या व्यक्ती यांचे दररोज तापमान पुढील १० दिवसांसाठी संनियंत्रण करावे.
(८) क्वारंटाईन विदयार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.
(९) शाळेतील एकाच वर्गातील ५ पेक्षा अधिक मुले दोन आठवडयाच्या कालावधीत कोविड बाधित आढळल्यास शाळेतील कोविड प्रतिबंधक कृतीयोजनेचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे.
(१०) शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी कोविड बाधित झाल्यासही ार्गदर्शक सूचना, स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने दिलेले आदेश यांचे काटेकोर पालन करावे.
(११) शाळेत काही विदयार्थी/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड सारखी लक्षणे आढळयास किंवा कोणी कोविड बाधित आढळल्यास शाळेत आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी शाळा प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
(१२) स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभागातील पथकाने भेट देऊन रुग्णाची व इतर परिस्थितीचा अभ्यास करुन कॉन्टॅक्स, निर्जंतुकीकरण, रुग्ण व्यवस्थापन याबाबत निर्णय घ्यावेत.
सविस्तर माहितीसाठी खालील परिपत्रक पाहावे.