2.माझ्या शाळेतील संविधान दिवस
आज आमच्या शाळेत संविधान दिवसा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शाळेचे प्रमुख कार्यकारी व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा समावेश आहे या समारंभाची मला खास उत्सुकता आहे कारण या कार्यक्रमांमध्ये विविध प्रेरक भाषणे ऐकण्यास मिळणार आहेत प्रमुख पाहुणे प्रेरक भाषणे देणार आहेत काही शिक्षकही त्यात भाग घेणार आहेत आजी-माजी विद्यार्थी मित्रमंडळी सुद्धा भाषण देण्याचा प्रयत्न करणार आहे तर याप्रकारे होणाऱ्या कार्यक्रमाची मला उत्सुकता आहे विशेष म्हणजे आज मी सुद्धा एक लहानसे भाषण देण्याचा प्रयत्न करणार आहे हे माझे भाषण मी चांगले रित्या देण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या भाषणाचा आराखडा तयार केला आहे तो पुढील प्रमाणे आहे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हांला 26 नोव्हेंबर संविधान दिन विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही कृपया शांततेत ऐकावे ही नम्र विनंती.
दलितांचे ते तलवार होऊन गेले ,
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले
होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होत त्यांना पण ते या जगाला घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
होय मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो....ते म्हणजे भारतीय संविधान!
सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य पैकी फाळणीनंतर २९९ सदस्यांनी १०८२ दिवसांनी म्हणजे दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत जवळपास १२००० पानांचे महान असे संविधान लिहिले. भारतीय संविधानात एकूण १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.
संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. १९४९ साली या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कोटी लोकांनी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते, ज्याचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. जगातील विविध देशांच्या राज्यघटनेतील विशेष गोष्टी भारतीय संविधानात मिसळून सशक्त आणि न्याय्य प्राप्त झाल्या आहेत.
संविधान सभेचे सदस्य भारतातील राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले गेले. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते.
26 नोव्हेंबर 1949 मध्ये, म्हणजेच या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. डॉ भीमराव आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान तयार करून राष्ट्राला समर्पित केले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच "संविधान दिन" साजरा केला. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी "संविधान दिन" साजरा केला जातो.
तुम्हांला माहीत आहे का की राज्यघटनेचा मसुदा तयार करताना टंकलेखन किंवा छपाईचा वापर केलेला नाही. भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले. तसेच आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.भारतीय संविधानाची मूळ संसदेच्या वाचनालयातील हेलियम भरलेल्या बॉक्समध्ये ठेवलं आहे.
शेवटी एकच म्हणतो-
घटना अशी लिहिली की
सूर्य चंद्र असे पर्यंत मिटणार नाही...
ऋण बाबासाहेबांचे या जन्मांत फिटणार नाहीत.
अ.क्र. | घटक | लिंक |
---|---|---|
1 | भारतीय संविधान (भाषण / निबंध) l Bhartiy Sanvidhan l संविधान दिन उपक्रम | पाहूयात |
2 | माझ्या शाळेतील संविधान दिवस l Mazya Shaletil Sanvidhan Divas l संविधान दिन | पाहूयात |
3 | संविधान यात्रा संविधान निर्मितीचा दिवस l भाषण /निबंध संविधान दिन उपक्रम | पाहूयात |
4 | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार l Bharatiy Rajyaghataneche Shilpkar l संविधान दिन उपक्रम | पाहूयात |
5 | भारतीय संविधान आणि लोकशाही शाश्वत विकास | पाहूयात |
6 | भारतीय संविधान मूल्य | पाहूयात |
7 | भारत देशा पुढील सद्यस्थिती आव्हाने आणि भारतीय संविधान | पाहूयात |
8 | सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे | पाहूयात |