इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

शिक्षण सप्ताह: शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव | दिवस तिसरा

शिक्षण सप्ताह: शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा
बुधवार दि. २४ जुलै २०२४ क्रीडा दिन

उपक्रम :

इयत्ता १ ली ते ५ वी

इयत्ता ६ वी ते १२ वी

सापशिडी, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या

बुद्धिबळ, सारीपाट, खो- खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम


क्रीडा शपथ - विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ म्हणून घ्यावी.

नवीन राष्ट्रीय धोरण (INEP 2020)  मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्री थोरणारा स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. या खेळांच्या गाध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.

१.विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी- १. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरुकता वाढविणे.
२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.
३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.
४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे.
५. खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे.
६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ)
७. विद्यार्थ्यामध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे.
८. विद्यार्थ्याना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.
९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यामध्ये सांघिक भावना वाढवणे.
१०. खेळातून विद्यार्थ्यामध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال