इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

सावित्रीबाई जोतीराव फुले- बालिका दिन

 

 सावित्रीबाई जोतीराव फुले



माझ्या सावू चा गं आज, असे जन्मदिन|
आज पोरीला या तुझ्या, वाटे अभिमान||

हाल अपेष्टा अपार, सोसल्या तू आई|
आम्ही मुलींनी करावी, कशी त्याची भरपाई?

शेन- दग डांचे वर्षाव, झेललेस अंगावर|
पण, जिद्दीपुढे तुझ्या, त्यांचे हरले प्रहार||

जोतिबाच्या संगे, उभी सावू कणखर|
तुम्हा दोघांच्या कारणे, आज मान माझी वर||

आई, तू एक ज्वाला , तलवार तळपती|
शक्ति लेखणिची, माझ्या दिलीस तू हाती||

आई, तुझ्या स्वप्नान्परी, मी शिकेन गं फार!
अभी राहीन गं ताठ, घेईन जग खांद्यावर||

प्रस्तावना

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारताच्या शिक्षणक्षेत्रातील आणि समाजसुधारणेतील एक महान व्यक्तिमत्व आहेत. भारतीय स्त्री शिक्षणाच्या इतिहासात त्यांचे कार्य गंगोत्रीसमान आहे. त्यांनी आपल्या पती महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा व आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला.

बालपण आणि विवाह

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे पाटील हे साधेपरंतु कर्तव्यनिष्ठ लोक होते. त्या काळात मुलींचे शिक्षण दुर्लक्षित होतेपरंतु त्यांच्या जीवनात महत्त्वाचा बदल त्यांच्या लग्नाने झाला. वयाच्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह १३ वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला.

शिक्षणाची सुरुवात

लग्नानंतर सावित्रीबाईंना शिकवण्याचे महत्त्व ज्योतिरावांनी ओळखले. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि शिक्षिका होण्यासाठी प्रेरित केले. पुढे त्यांनी १८४८ साली पुण्याच्या भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.

स्त्री शिक्षणासाठी लढा

त्याकाळी समाजाने स्त्री शिक्षणाला मोठा विरोध केला. सावित्रीबाईंवर चिखलफेक केली जाईअपमान केला जाईपरंतु त्या खंबीर राहिल्या. मुलींचे शिक्षण ही समाजातील क्रांती होतीजी सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने साध्य केली.

समाजसुधारणेतील योगदान

शिक्षणाबरोबरच सावित्रीबाईंनी विधवाविवाहाला प्रोत्साहन दिलेबालविवाहाला विरोध केला आणि अस्पृश्यांसाठी आश्रय दिला. त्यांनी आपल्या पतीसोबत सामाजिक क्रांतीचे नेतृत्व केले.


आंतरजातीय विवाह आणि अंत्यसंस्कार

जुलै १८८७मध्ये ज्योतिरावांना पक्षाघात झाला आणि २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सावित्रीबाईंनी स्वतः पुढाकार घेतला आणि समाजातील रूढी-परंपरांना न जुमानता ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणत समाजात नवीन आदर्श निर्माण केला.

प्लेगच्या साथीतील सेवा

१८९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. सावित्रीबाईंनी प्लेगग्रस्तांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. मात्रसेवाकार्य करताना त्यांना प्लेग झाला आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाईंचा वारसा

सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार आजही प्रेरणादायी आहेत. १९९५ पासून त्यांच्या जन्मदिनाला बालिका दिन म्हणून साजरे केले जाते. "ज्ञानज्योती" आणि "क्रांतिज्योती" या उपाधीने त्यांना सन्मानित केले जाते.

निष्कर्ष

सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या कार्यामुळे भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणले. त्यांचे योगदान भारतीय समाजासाठी अमूल्य आहे. शिक्षकशिक्षणतज्ज्ञआणि समाजसुधारक म्हणून त्यांची भूमिका सदैव प्रेरणा देणारी राहील

 


सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा:

  1. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात:
    • १ जानेवारी१८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली.
    • या शाळेत सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून नेमले गेले. त्यामुळे त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात.
    • १८४८ ते १८५२ या चार वर्षांत त्यांनी एकूण १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.
  2. साहित्य आणि काव्यलेखन:
    • १८५४ साली काव्यफुले’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
    • या साहित्यातून त्यांनी स्त्रीशिक्षणसमाजातील विषमता आणि सुधारणा यांसाठी प्रेरणा दिली.
  3. बालहत्या प्रतिबंधक गृह:
    • २८ जानेवारी १८६३ रोजी जोतीरावांच्या पुढाकाराने सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
    • या गृहात विधवा महिलांसाठी प्रसूतिगृहही सुरू करण्यात आलेजेथे विधवा महिलांच्या बाळंतपणाची देखभाल केली जात असे.
    • ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजासमोर समानतेचा आदर्श उभा केला.
  4. दुष्काळातील कार्य (१८७६–७७):
    • या कठीण काळात सावित्रीबाईंनी समाजासाठी अन्ननिवाराआणि मदतीचे काम केले.
    • त्यांनी गरजूंना आधार दिला आणि समाजकार्याचा आदर्श घालून दिला.
  5. सत्यशोधक समाज:
    • १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
    • सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा प्रसार केला.
  6. दुष्काळातील महिलांसाठी कार्य (१८९६):
    • दुष्काळामुळे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना सावित्रीबाईंनी सत्यशोधक कुटुंबांमध्ये आसरा दिला.
    • पंडिता रमाबाई आणि गायकवाड सरकार यांनीही त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला.
  7. प्लेगच्या साथीतील सेवा:
    • १८९६–९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. सावित्रीबाईंनी ससाणे माळावर दवाखाना सुरू करून प्लेगग्रस्तांची सेवा केली.




सावित्रीबाई फुले आणि त्यांचे साहित्ययोगदान व कार्य

१) साहित्यिक योगदान

  • काव्यफुले’ (१८५४):
    • सावित्रीबाईंच्या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत.
    • निसर्गसमाजआत्मपरबोधपरआणि इतिहासविषयक विषयांवर आधारित.
    • स्त्री-पुरुष समानतानिसर्गप्रेमकृषक संस्कृतीशिक्षणाचे महत्त्व यांचा समावेश.
    • शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्वागतगीत आणि बालकविता लिहिल्या.
    • ग्रामीण भागातील स्त्रीशिक्षणाची गरज अधोरेखित केली.
  • बावनकशी सुबोध रत्नाकर’ (१८९२):
    • जोतीरावांचे काव्यमय आद्यचरित्र आणि शूद्रातिशूद्रांच्या मुक्तीचा इतिहास.
    • वैदिक परंपरेचा विरोध व अवैदिक परंपरेशी नाते जोडले.
    • छत्रपती शिवाजी महाराजमहाराणी ताराबाई यांच्यावर आधारित पोवाडा.
    • ताराबाईवरील पोवाडा एका स्त्रीने रचलेला विशेष पोवाडा.
  • अभंग आणि अन्य लिखाण:
    • अंधश्रद्धारूढी-परंपरांविरोधात अभंग लिहिले.
    • जोतीरावांना लिहिलेली पत्रे आणि त्यांची भाषणे प्रकाशित केली.
    • सामाजिक कुरीतींवर स्पष्टपणे भाष्य केले.
    • दारूजुगारवेश्यागमन यांविरोधात पुरुषांची कानउघडणी केली.
    • उद्योगसदाचरणविद्यादान यांचे महत्त्व पटवून दिले.

२) सामाजिक योगदान

  • स्त्रीशिक्षण आणि सक्षमीकरण:
    • मुलींना शिक्षण देण्यावर भरशाळांसाठी कविता रचल्या.
    • शिक्षणासाठी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मुलींना प्रोत्साहित केले.
  • सत्यशोधक विचारांचा प्रसार:
    • सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे नेतृत्व.
    • महिलांमध्ये सत्यशोधक विचार रुजवले.

३) मान्यता आणि गौरव

  • १९८८ साली डॉ. मा. गो. माळी यांनी ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’ प्रकाशित करून त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळवून दिली.
  • १९९५ पासून ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • त्यांना ‘क्रांतिज्योती’ ही उपाधी प्रदान करण्यात आली.
  • ९ ऑगस्ट २०१४ रोजी पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले.
  • १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

४) सावित्रीबाईंचा ठसा आणि परंपरा

  • सत्यशोधक चळवळीची परंपरा त्यांच्या खंबीर नेतृत्वानंतर पुढे चालवली गेली.
    • तान्हुबाई बिर्जेसावित्रीबाई रोडेआणि अन्य सत्यशोधक स्त्रियांनी चळवळ पुढे नेली.
    • सत्यशोधक विचारांचा प्रसार देशभर केला गेला.
    • सुषमा देशपांडे यांचे नाटक व्हय मी सावित्रीबाई’ लोकप्रिय.
    • त्यांच्या कवितांचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला.

मृत्यू

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्चइ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.



स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात ,

पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती

म्हणून तर आज जागती …..

अमर आहे सावित्री…..



Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال